जालंधर (पंजाब)- जालंधर येथे दलीपसिंह उर्फ द ग्रेट खली याच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये दोन महिलांमध्ये आश्चर्यकारक फाइट पाहायला मिळाली. येथे हरियाणाच्या माजी पोलिस ऑफिसर कविताने भारताची पहिली वुमन रेसलर आणि खलीची स्टूडंट बीबी बुलबुलला नॉक आउट केले. फाइट सुरू होण्या आधी बीबी बुलबुल रिंगमध्ये उभी राहून उपस्थितांना खुले आव्हान देत होती. तिच्या या आव्हानाचा स्विकार करत, कविता आहे तशीच रिंगमध्ये उतरली आणि सुरू झाली अफलातून फाईट...
कविताने अशी केली फाइट...
- मिक्स मार्शल आर्ट्स चॅम्पियन कविता सर्व प्रथम हे सर्व गमतीत घेते, मात्र तेव्हड्यात बीबी बुलबुल तिला जोराचा धक्का देत ढकलून देते.
- यामुळे चिडलेली कविता अक्षरशः बुलबूलवर तुटून पडते आणि तिच्यावर जोरदार प्रहार करायला सुरुवात करते.
- यानंतर फाइट सुरू असताना इतर रेसलर्स रिंगमध्ये येतात. ते कविताला बीबीपासून दूर करतात. पण पुन्हा बीबी बुलबुल जोशमध्ये येऊन हल्ला करते. मात्र पुन्हा एकदा कविता समोर येऊन तिला चित करते.
फ्री स्टाइल कुस्तीचे डाव-पेच शिकत आहेत रेस्लर
- द ग्रेट खलीचे चाहत्यांच्या नेहमीच तोंडावर राहते. तो एक जबरदस्त रेसलर होता. सध्या तो भारतात महाबली निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे.
- त्याने जालंधरमध्ये कॉन्टिनेंटल रेसलिंग एंटरटेनमेंट (CWE) नावाची अॅकॅडमी सुरू केली आहे. येथे रेसलर्सला फ्रि स्टाइल कुस्तीचे डाव-पेच शिकवले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कविताने कशी केली खलीच्या रेसलरची धुलाई... आणि पाहा अफलातून Video