आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा बांगलादेशवर ३६ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्णधार आणि सलामीवीर चार्लोट एडवर्ड्स हिच्या ६० धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंड महिला संघाने बांगलादेशला वर्ल्डकप टी-२० मध्ये ३६ धावांनी हरवले. टी-२० महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने विजयाने आपल्या अभियानाला सुरुवात केली.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने ७ बाद १५३ धावा काढल्या. यानंतर त्यांनी बांगलादेश महिला संघाला ६ बाद ११७ धावांवर रोखले. इंग्लंडकडून चार्लोटने ५१ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ६० धावांची तुफानी खेळी केली. नताली शिवरने २७ धावांचे योगदान दिले. बांगलादेशची मध्यमगती गोलंदाज जहांआरा आलमने ३२ धावांत ३ विकेट घेतल्या. बांगलादेशकडून निगार सुल्तानाने ३५, सलमा खातूनने नाबाद ३२ धावा काढल्या. इंग्लंडकडून आन्या श्रबसोलने २७ धावांत २ गडी बाद केले. ब्रुंट, गुन, हेझल या तिघींनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...