आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Womens World T20 Pakistan Vs West Indies At Chennai Javeria Khan Kept Under Observation After Taking Knock To Jaw

पाक महिला क्रिकेटपटूचा ग्राउंडवरच तुटला जबडा, टीम इंडियाविरुद्ध नाही खेळू शकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील सलामीवीर जावेरिया खान वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात मैदानावर जखमी झाली. सेकंड इनिंगच्या पहिल्या षटकांत शामीलिया कोनेलने टाकलेला चेंडू जावे‍रियाच्या जबड्याला लागला. ती मैदानावरच कोसळली. तिला तत्काळ चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे. तिच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे 19 मार्च रोजी भारताविरुद्ध होणार्‍या लढतीत ती खेळ शकणार नाही.

भारताविरुद्ध खेळणार नाही जावेरिया...
- जावेरियाची प्रकृती स्थीर असून तिला 24 तास ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
- दुखापतीमुळे जावेरियाला संघासोबत दिल्लीला येता आले नाही. पाकिस्तान संघ 19 मार्चला भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
- पाकिस्तानी क्रिकेटपटू मैदानावर गंभीर जखमी झाल्याची पहिल्यांच घटना घडली आहे.
- पाकिस्तान संघाची कर्णधार सना मीर यांनी सांगितले, की जावेरिया गंभीर जखमी झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला पुढील सामने खेळता येणार नाही.

वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा केला पराभव...
- या लढतीत वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा 4 धावांनी पराभव केला.
- प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा कर्णधार स्टेफिनी टेलर यांने धडाकेबाज 40 धावा केल्या. वेस्ट इंडिजने पाकसमोर विजयासाठी 103 धावांचे आव्हान दिले.
- पाकिस्तान संघानी 20 षटकांत 5 विकेटच्या नुकसानावर 99 धावा करू शकला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकची सलामीवर जावेरिया अशी झाली जखमी...
बातम्या आणखी आहेत...