आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World T20: Pakistan Cleared To Play In Tournament In India

टी-20 वर्ल्डकप : भारत-पाकिस्तान सामना धर्मशाला येथेच होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - अखेर पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला भारताचा दौरा करण्याची परवानगी दिली आहे. पाक सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने पाकची टीम भारताच्या यजमानपदाखाली होत असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत खेळू शकेल. भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना नियोजित वेळेनुसार १९ मार्च रोजी धर्मशाला येथेच खेळवला जाईल.

पाकिस्तान सरकारने सुरुवातीला भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपल्या संघाला सुरक्षेच्या कारणामुळे खेळण्याची परवानगी देणे थोडे अडचणीचे आहे, असे सांगितले होते. यामुळे पाक क्रिकेट संघ भारतात खेळण्यास येईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सरकारकडून दौऱ्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले. शहरयार खान म्हणाले, "मला सांगताना आनंद होत आहे की, आमच्या संघाला भारताचा दौरा करण्याची परवानगी मिळाली आहे. आम्ही आयसीसीला आमच्या संघासाठी खास सुरक्षा करण्याची विनंती केली आहे. आम्ही संघाच्या दौऱ्याशिवाय पाकच्या चाहत्यांसाठी व्हिसा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली आहे. यामुळे पाकचे चाहते क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी भारतात जाऊ शकतील.' वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना १६ मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनवर होईल.

मेहमूद अंतरिम कोच
आशिया चषक आणि आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी पीसीबीने माजी क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू अझहर मेहमूदची अंतरिम कोच म्हणून नियुक्ती केली आहे. अझहर आता मुश्ताक अहेमदची जागा घेईल. मुश्ताकला विश्रांती देण्यात आली आहे. यावर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी मुश्ताक पुन्हा जबाबदारी सांभाळेल, अशी शक्यता आहे.