आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानची बांगलादेशवर ५५ धावांनी मात; शाहिद आफ्रिदीच्या २ विकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - अनुभवी अष्टपैलू खेळाडू, कर्णधार आणि प्लेअर ऑफ द मॅच शाहिद आफ्रिदीच्या (४९ धावा, २ विकेट) दमदार प्रदर्शनाच्या बळावर पाकिस्तानने वर्ल्डकप टी-२० स्पर्धेच्या सुपर-१० मध्ये बांगलादेशला ५५ धावांनी हरवले. बांगलादेशविरुद्ध मोहंमद हाफिज (६४) आणि अहेमद शहेजाद (५२) यांनीही अर्धशतके ठोकली. पाकच्या खेळाडूंनी २२ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

पाकिस्तानने ५ बाद २०१ धावांचा डोंगर उभा केला. पाकने बांगलादेशला ६ बाद १४६ धावांवर रोखले. यासह पाकने आशिया चषकातील पराभवाचा हिशेबही चुकता केला.
पाकने टॉस जिंकत ईडन गार्डनवर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून तिघांनी आक्रमक खेळी केली. हाफिजने ४२ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावा ठोकल्या. शहेजादने ३९ चेंडूंत ८ चौकारांसह ५२, तर आफ्रिदीने अवघ्या १९ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांसह ४९ धावा ठोकल्या. बांगलादेशकडून तस्किन अहेमदने ३२ धावांत २ विकेट, सनीने ३४ धावांत २ विकेट आण शब्बीर रहेमानने ११ धावांत १ गडी बाद केला.

धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने सौम्य सरकारची विकेट लवकर गमावली. यानंतर बांगलादेशने सलग संघर्ष केला. तामिम इक्बालने २४, शब्बीर रहेमानने २५, तर सकिब-अल-हसनने नाबाद ५० धावा काढल्या. आमेरने २७ धावांत २ विकेट, इरफान व इमान वसीमने प्रत्येकी १ गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक : ५ बाद २०१, बांगलादेश : ६ बाद १४६ धावा
बातम्या आणखी आहेत...