आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#WT20 वेळापत्रक जाहिरः 19 मार्चला भारत-पाक, 3 एप्रिलला अंतिम सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी लॉन्चिगच्या वेळी शिखर-विराट-रहाणे. - Divya Marathi
टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी लॉन्चिगच्या वेळी शिखर-विराट-रहाणे.
दुबई- आयसीसीने टी-20 विश्वचषक-2016 चे वेळापत्रक जाहिर केले असून पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच गटात समावेश करण्यात आले आहे. आता हे दोन्ही संघ 19 मार्च रोजी धर्मशाळा येथे आमने सामने उतरतील. 11 मार्चपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून 3 एप्रिल रोजी या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल.
टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक?
- 11 मार्चपासून टी-20 विश्वषक- 2016 ला सुरुवात होणार असून 3 एप्रिल रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे.
- बेंगळुरु, चेन्नई, धर्मशाला, मोहाली, मुंबई, नागपूर, दिल्ली आणि कोलकाता हे संघ यात सहभागी असतील.

T-20च्या आधी भारताची मालिका
- T-20 च्या आधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे.
- T-20 विश्वचषका आधी बांगलादेशमध्ये T-20 आशिया कप (भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान) खेळला जाणार आहे.

सुपर 10 पात्रतेसाठी संघ
-ग्रुप-ए: बांगलादेश, नेदरलंड, आयरलंड, ओमान.
-ग्रुप-बी : झिंम्बाब्वे, हाँगकाँग, स्कॉटलंड, अफगानिस्तान.
सुपर-10 मधील संघ
-ग्रुप-1 : श्रीलंका, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि पहिल्या स्टेजमधील ग्रुप-बीमधील विजेता संघ.
-ग्रुप-2 : भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि पहिल्या स्टेजमधील ग्रुप-एमधील विजेता संघ.
पुढील स्लाइड्सवर पाहा, T20 विश्वचषक-2016 च्या ट्रॉफी लँचिंगचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...