आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडकडून आफ्रिकेची धुलाई, रोमहर्षक विजय; आफ्रिकेवर २ गड्यांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जो रुटच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अायसीसीच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत राेमहर्षक विजय मिळवला. या टीमने स्पर्धेतील अापल्या करा वा मरा सामन्यात दक्षिण अाफ्रिकेवर २ गड्यांनी मात केली. इंग्लंडने विजयाचे खडतर २३० धावांचे लक्ष्य ८ गड्यांच्या माेबदल्यात गाठून स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अाफ्रिका टीमने ४ गडी गमावून निर्धारित २० षटकांत २२९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने २ गडी राखून विजयाची नाेंद केली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला जेसन राॅय (४३) अाणि हेल्सने (१७) दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने टीमला ४८ धावांची शानदार सलामी दिली. दरम्यान, एबाेटने ही जाेडी फाेडली. त्याने सलामीच्या हेल्सला पायचीत केले.
विजयाचा ‘रुट’!
इंग्लंड टीमची हाेणारी पडझड थांबवून जोने टीमच्या विजयाचा मजबूत रुट तयार केला. त्याने झंझावाती ८३ धावांची खेळी केली. त्याने अाफ्रिकेच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत ४४ चेंडूंमध्ये सहा चाैकार अाणि चार षटकारांच्या अाधारे ही धावसंख्या रचली.
न्यूझीलंड संघ विजयी; कांगारूंना दणका
धर्मशाला - न्यूझीलंडने शुक्रवारी अायसीसीच्या टी-२० विश्वचषकात अाॅस्ट्रेलियाला दणका दिला. न्यूझीलंडने सामन्यात ८ धावांनी शानदार विजय संपादन केला. मॅक्लिनघन (३/१७) व सँटनर (२/३०) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने सामना जिंकला. यासह न्यूझीलंड टीमचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड टीमने ८ बाद १४२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये अाॅस्ट्रेलिया टीमला ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १३२ धावांपर्यंत मजल मारता अाली.