आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REWIND 2015: कुणी झाले विवस्त्र, कुठे दहशतवादी हल्ला तर कुणी चढले बेहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2015 चा शेवट अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. 2016 ची पाहाट होईल अन् सुरुवात होईल इंग्रजी नववर्षाला. या सरत्या वर्षात, खेळ जगतात अनेक लहान-मोठ्या, बऱ्या-वाईट घटना-घडामोडी घडल्या. मात्र त्यातील काही घटनांनी अगदी सहजपणे लक्ष वेधून घेतले. या वर्षात दहशतवादी हल्यापासून ते खेळाडूंच्या LOVE Marriage पर्यंत, क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचारापासून ते खेळाडूंच्या निवृत्ती पर्यंत आणि अमेरिकेतील क्रिकेट टुर्नामेंटपासून ते भारत-पाक सामन्यांच्या घुमजावापर्यंत अशा अनेक घटना चर्चेत राहिल्या. या सरत्या वर्षाच्या निमित्ताने अशाच काही खास घडामोडींचा धावता पण लक्षवेधक आढावा.
2015 भारतीय क्रिकेटसाठी 50-50
या वर्षात काही क्रिकेट स्टार्स बोहल्यावर चढले. काही खेळाडूंनी निवृत्ती घेतली. यात धोनीने कसोटीतून घेतलेली निवृत्ती लक्षवेधी ठरली. क्रिकेटमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आले. BCCI चे अध्यक्ष दालमिया यांचा अखेरचा निरोप. क्रिकेट आयपीएलच्या धरतीवर इतर खेळांना सुरुवात. आयपीएलमध्ये दोन नवीन संघ अवतरले. अशा अनेक घटना आणि घडामोडींनी हे वर्ष गाजले.
क्रिकेट शिवाय काय खास...
हे वर्ष टेनिस स्टार सेरेना विलियम्स आणि नोवाक योकोविकसाठी विशेष ठरले. सेरेना या वर्षांत पुन्हा एकदा जागतीक क्रमवारित अव्वल तर पुरुषांमध्ये नोवाक योकोविक अव्वल स्थानावर राहिला. क्रिडा क्षेत्रातील 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड' या नामांकीत मासिकाने तर सेरेनाची जगातील सर्व श्रेष्ठ खेळाडू म्हणून निवड केली. ही निवड खेळ इतिहासातील महत्त्वाची घटना होती. सानिया-मार्टीन जोडीनेही या वर्षात चांगलीच कमाल केली. ही जोडी युएस ओपन 2015 मध्ये अव्वल ठरली. एवढेच नाही तर क्रिकेटशिवाय इतर खेळांनाही या वर्षात जोरदार प्रतिसाद मिळाला.
पुडील स्लाइड्सवर जाणून घ्या, खेळ विश्वासाठी कसे राहिले 2015...
- धोनिसह कुणी-कुणी घेतली निवृत्ती...
- अफेअरनंतर कोण-कोण चढले बोहल्यावर...
- कोण झाले होते विवस्त्र
- पहिल्यांदाच भारत कुणाकडून हरला मालिका...