आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहिद आफ्रिदीने मामाच्याच मुलीशी केले लग्न, पण टीचर होती \'पहला पहला प्यार !\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी आणि पत्नी नादियासह शाहिद आफ्रिदी. - Divya Marathi
मुलगी आणि पत्नी नादियासह शाहिद आफ्रिदी.
शाहिद आफ्रिदी, पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर, मात्र सध्या शाहिद आणि इंडियन मॉडेल अर्शी खान यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने मात्र ही गोष्ट साफ नाकारली आहे. तर दुसरीकडे अर्शीने ट्वीट करून रिलेशनशिपचे हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले, पण लगेचच मंगळवारी संध्याकाळी शाहिदबरोबर तिचे फिजिकल रिलेशन असल्याची पुष्टी करून तिने सर्वांनाच आश्चर्य चकितही केले. असो... काहिही असले तरी, पाकिस्तानच्या या दिग्गज ऑलराउंडरने त्याच्याच मामाच्या मुलीशी लग्न केले असून त्याला चार मुलीही आहेत.

वडिलांच्या पसंतीने केले मामाच्या मुलीशी लग्न
शाहिद आफ्रिदी फार ट्रेडिशनल असल्याचे मानले जाते. तो त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कधीच माध्यमांसमोर बोलत नाही. मात्र जेव्हाही त्याला त्याच्या पत्नी विषयी विचारलेजाते, तो मोठ्या दिलखुलासपणे उत्तरे देतो. एका इंटरव्हूमध्ये शाहिदला त्याच्या लग्नासंदर्भात विचारले असता त्याने सांगितले होते की, एका दौर्‍यावर जाण्याआधी मी माझ्या वडिलांची मजाक केली होती. मी त्यांना म्हटले होतो की, माझासाठी एक मुलगी बघा. मात्र माझे बोलने त्यांनी जरा जास्तच सिरिअस घेतले. जेव्हा मी टोर्नामेंट संपल्यावर परदेशातून पतरलो तेव्हा, ते मला घराच्या गच्चीवर घेऊन गेले आणि म्हणाले की, मी तुझा साखरपुडा उरकला आहे. हे ऐकूण मी शॉक झालो. आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की, शाहिदची होणारी पत्नी दुसरी- तिसरी कुणी नसून त्याच्याच मामाची मुलगी नादिया होती.
लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी गेला सामना खेळायला
शाहिद आफ्रिदी आणि नादिया यांचा विवाह 22 ऑक्टोबर, 2000 रोजी झाला. इंग्लंडविरुद्ध सीरीज सुरू होती. शाहिद लग्नाच्य दुसर्‍याच दिवशी टीमसोबत गेला होता. लग्नानंतर लाहोरमध्ये झालेल्या या पहिल्याच सामन्यात आफ्रिदीने खळबळ उडवून दिली. त्याने या सामन्यात हाफसेंच्युरी करत तब्बल 5 विकेट्सदेखील घेल्या. त्याला मॅन ऑफ दी मॅच घोषित करण्यात आले. मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले तत्कालीन राष्ट्रपति मुशर्रफ यानीही त्याचे कौतुक केले होते.
नादिया नाही, कुणी दुसरेच होते पहिले प्रेम
एकदा शाहिद आफ्रिदीने स्वतःच खुलासा केला होता की, तो शाळेत शिकत असतानाच प्रेमात पडला होता. तो जिच्या प्रेमात पडला ती कुणी दुसरी-तिसरी नसून खुद्द त्यला शिकवणारीच एक टीचर होती. त्याने गमतीने असेही सांगितले होते की, ते लहानपण होते. तेव्हा मी केवळ 9 वर्षांचा होतो. मी टीचरच्याच प्रेमात पडलो होतो. ती फार सुंदर होती. शाहिद आणि नादियाला अक्सा, अज्वा, अस्मरा आणि अनस्पा अशा चार मुली आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शाहिद आफ्रिदीची पत्नी आणि मुलींचे फोटो...