नवी दिल्ली/ पानिपत- योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. मात्र, आता तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरू शकतो. त्याने ज्या ६० किलो गटात कांस्य जिंकले त्या गटातील रौप्यपदक विजेता रशियाचा बेसिक कुदुखोव्ह डोपिंगमध्ये पूर्वीच फेल झाला आहे.
आता याच गटातील सुवर्णपदक विजेता अझरबैजानचा तोगरुल असगारोव्ह हाही डोपिंगमध्ये दोषी आढळला. २००४नंतर प्रथमच एका क्रीडा प्रकारातील दोन पदके परत घेतली जातील. कुस्तीमध्ये दोन कांस्यविजेते असतात. त्यामुळे सुवर्णपदक कुणाला मिळेल, हे इतक्यात सांगता येणार नाही, परंतु योगेश्वरला ही संधी आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आणखी कोण आहे सुवर्णपदकाच्या शर्यतीत...