आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा टीम विजयी; पाकिस्तान संघाला दणका! भारताचा ३-० ने विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग- भारताच्या युवा संघाने  एशियन ज्युनियर टीम स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारतीय पुरुष संघाने अ गटातील सामन्यात पाकवर ३-० अशा फरकाने मात केली.
  
भारताने एकाच दिवशी धडाकेबाज दाेन सामन्यांत विजयाची नाेंद केली. भारताने इराणपाठाेपाठ पाकिस्तानचा पराभव केला. अभय सिंग, व्ही. सेथींकुमार अाणि अार्यमान अादिक यांनी उल्लेखनीय खेळीच्या बळावर भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. अभय सिंगने पाकच्या अब्बास झेबला धूळ चारली. दुसरीकडे सेथींकुमारने पाकच्या मेहरान जावेदचा पराभव केला.  

मुलींचा पराभव : या स्पर्धेत महिलांच्या ब गटातील सामन्यात भारतीय युवा महिला खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...