आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा टीम विजयी, घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताच्या युवा संघाने अापल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. भारताने १२९ धावांनी दुसरा वनडे जिंकला. यासह भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील वनडे मालिकेत १-१ ने बराेबरी साधली.  अाता मालिकेतील तिसरा वनडे शुक्रवारी रंगणार अाहे. यापूर्वी सलामीचा सामना जिंकून इंग्लंडने  अाघाडी मिळवली हाेती. 
  
अनुकूल राय (३/३४), शिवम मवी (२/१३) अाणि ईशान पाेरेल (२/३३) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने ३३.४ षटकांमध्ये सामना जिंकला.  

हिमांशू राणा (५८) अाणि हार्विद देसाई (७५) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारतीय युवा संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमाेर २८७ धावांचा डाेंगर रचला हाेता. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या युवा संघाने ३३.४ षटकांमध्ये अवघ्या १५८ धावांमध्ये गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून  रावलिन्सने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. मात्र, इतर सर्व युवा फलंदाजफार काळ अाव्हान कायम ठेवू शकले नाहीत. त्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...