आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yunus Shan Hit Centuries, Pakistan Near To Victory

युनूस-शानची शतके; पाक विजयासमीप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लिकल - मालिकेतील तिसरी कसोटी जिंकण्याची संधी पाहुण्या पाक संघाला चालून आली आहे. तिस-या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर विजयासाठी आवश्यक असलेल्या ३७७ धावांचा पाठलाग करताना पाकने २ बाद २३० धावा काढून जबरदस्त कामगिरी केली. सामन्याचा एक दिवस शिल्लक असून पाक विजयासाठी आणखी १४७ धावांचीच गरज आहे. शिवाय त्यांच्या ८ विकेटही शिल्लक आहेत. सलामीवीर शान मसूद (नाबाद ११४) आणि अनुभवी फलंदाज युनूस खान (१०१) यांच्या दमदार शतकाच्या बळावर पाकला हा विजय दृष्टिपथात आला आहे.

सकाळी श्रीलंकेने दुस-या डावात ५ बाद २२८ धावांवरून पुढे सुरुवात केली. कालचा नाबाद फलंदाज मॅथ्यूजने दमदार शतक ठोकत १२२ धावा चोपल्या. चांदिमलनेही ६७ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली. मॅथ्यूजने २५२ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकार मारले. चांदिमलने १०३ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. या दोघांनी श्रीलंकेला ३१३ धावांपर्यंत पोहोचवले. पहिल्या डावात आघाडीच्या बळावर लंकेने पाकसमोर ३७७ धावांचे लक्ष्य ठेवले.
धावांचा पाठलाग करताना पाकची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर अहेमद शहेजाद शून्यावरच लकमलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिस-या क्रमांकावर आलेला अझहर अलीही ५ धावा काढून चालता झाला. यानंतर शान मसूद आणि युसून खान यांनी २१७ धावांची अभेद्य भागीदारी करून पाकला संकटातून बाहेर काढले.

युनूस-शानची शतके
युनूस खान व सलामीवीर शान मसूद यांनी पाक संघ अडचणीत असताना दमदार भागीदारी केली. या दोघांनी फक्त संकट दूर केले नाही, तर विजयाची संधीही निर्माण केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शान मसूद ११४, तर युनूस खान १०१ धावांवर खेळत होते. शानने १९८ चेंडूंत १ षटकार, ११ चौकारांसह ही खेळी साकारली, तर युनूसने १६६ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार मारले.
छायाचित्र: शतकी खेळी दरम्यान चाैकार खेचताना पाक युनूस खान.