आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट पर्वात युवीचे कमबॅक, नवोदित ऋषभ पंतची संघात निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट अाता नव्या वर्षात नव्या पर्वामध्ये प्रवेश करत अाहे. फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. याची अधिकृत घाेषणा एम. एस. के. प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने शुक्रवारी केली. धाेनीने पद साेडल्यामुळे अाता काेहलीकडे वनडे टीमचेही नेतृत्व अाले अाहे. इंग्लंडविरुद्ध तीन वनडे व तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात अाला. यामध्ये  युवराजसिंगला तीन वर्षांनंतर संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.  रणजीमध्ये वेगवान शतक ठाेकणाऱ्या १९ वर्षीय ऋषभ पंतची टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली अाहे. अाशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहललाही संघात स्थान मिळाले अाहे.
   
येत्या १५ जानेवारीपासून भारत अाणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. सलामीचा सामना पुण्याच्या मैदानावर रंगणार अाहे. याशिवाय २६ जानेवारीपासून या दाेन्ही संघांतील टी-२० मालिकेला सुरुवात हाेईल.

युवीचे पुनरागमन : युवराजसिंगला इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. त्याची वनडे अाणि टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली.  त्याने रणजी ट्राॅफीमध्ये ८ सामन्यांत ७२४ धावा काढल्या. यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात अाल्याचे निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी स्पष्ट केले. युवीने शेवटचा वनडे डिसेंबर २०१३ मध्ये अाफ्रिकेविरुद्ध  व टी-२० मार्च २०१६ मध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकपमध्ये खेळला हाेता.   

सुरेश रैना टी-२० संघात 
सुरेश रैनाला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवता अाले नाही. त्याला केवळ टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्याने शेवटचा टी-२० मार्चमध्ये खेळला. मात्र, त्याने २०१५ पासून वनडे संघात स्थान मिळवले नाही.

वनडे मालिका
विराट काेहली (कर्णधार), महेंद्रसिंग धाेनी, लाेकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, अार. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

टी-२० मालिका : विराट काेहली (कर्णधार), महेंद्रसिंग धाेनी, मनदीप सिंग, लाेकेश राहुल, युवराजसिंग, ऋषभ पंत, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, अार. अश्विन, यजुवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अाशिष नेहरा. 

सरावासाठी धाेनी, रहाणेकडे नेतृत्व
मुंबई- इंग्लंडविरुद्ध अागामी वनडे अाणि टी-२० मालिकेच्या तयारीसाठी यजमान टीम इंडियाने सराव सामन्यांचे अायाेजन केले अाहे. यासाठी महेंद्रसिंग धाेनी अाणि अजिंक्य रहाणेकडे भारत अ संघाचे नेतृत्व साेपवण्यात अाले. येत्या १० अाणि १२ जानेवारी राेजी सराव सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. येत्या १५ जानेवारीपासून टीम इंडिया अाणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेईल. मालिकेतील सलामीचा सामना पुण्याच्या मैदानावर रंगणार अाहे. धाेनीच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ १० जानेवारी राेजी पहिला सराव सामना खेळणार अाहे. त्यानंतर १२ जानेवारी राेजी हाेणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारत अ संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेकडे साेपवण्यात अाली. मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर केला.
बातम्या आणखी आहेत...