आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Out Of The Team, Disclosure Of Team India For ODI Series Against Sri Lanka

युवराज टीममधून बाहेर; श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या २० अाॅगस्टपासून यजमान श्रीलंकेविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घाेषणा करण्यात अाली. स्फाेटक फलंदाज युवराज सिंगला टीमबाहेर करण्यात अाले.
 
फिरकीपटू अार.अश्विन अाणि नंबर वन अाॅलराउंडर रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात अाली. तिरंगी मालिका जिंकून देणाऱ्या युवा टीमच्या कर्णधार मनीष पांडेला संधी देण्यात अाली. तसेच मुंबईचा वेगवान गाेलंदाज शार्दूल ठाकूरला प्रथमच वनडे टीममध्ये स्थान मिळाले अाहे.   
 
अार.अश्विन, रवींद्र जडेजा, माे.शमी अाणि उमेश यादवला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात अाला. फिट हाेऊन कसाेटीत शानदार शतक ठाेकणाऱ्या लाेकेश राहुलला वनडे टीममध्ये सहभागी करण्यात अाले. त्यासाठी ऋषभ पंतला विश्राती देण्यात अाली.   

युवराज सिंग यापूर्वी विंडीजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेमध्ये सपशेल अपयशी ठरला. त्याने मागील सात सामन्यांत केवळ १६२ धावा काढल्या हाेत्या. चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये त्याने १०५ अाणि विंडीज दाैऱ्यात ५७ धावा काढल्या  हाेत्या.   
 
सुरेश रैनाच्या मेहनतीवर पाणी
नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये पुनरागमनासाठी सुरेश रैनाने केलेल्या कसून मेहनतीवर पाणी फिरले. त्याच्याकडे निवड समितीने पुन्हा एकदा पाठ फिरवली.
 
मनीष पांडेला संधी
दक्षिण अाफ्रिका दाैऱ्यात भारत अ संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या मनीष पांडेला संधी मिळाली. त्याने दाैऱ्यातील सहा डावांत ३३, ५५, नाबाद ४१, नाबाद ८६, नाबाद ९३ अाणि नाबाद ३२ धावांची खेळी केली.

भारतीय संघ
विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, मनीष पांडे, लाेकेश राहुल, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, शार्दूल ठाकूर.
 
बातम्या आणखी आहेत...