नवी दिल्ली- ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनगेड्सकडून खेळताना 12 चेंडूत अर्धशतक ठोकले. ही कामगिरी करताना त्याने युवराजसिंगच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधली. यानंतर युवराजने ट्वीट करून गेलला पुढील वेळी 10 चेंडूतच अर्धशतक ठोक असे म्हटले.
ट्वीटमध्ये काय म्हणाला युवी....
- “गेलच्या या इनिंगमुधे मी निराश झालो. काका, पुढील वेळी 10 चेंडूतच अर्धशतक ठोक.”
- युवराजने द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सलाही असेच सांगितले होते.
गेलने किती धावा केल्या आणि कसा ठरला हा सामना
- गेलने 17 चेंडूत 57 धावांची खेळी केली. त्याने 2 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
- गेलचा संघ मेलबर्न रेनगेड्स अशा खेळीनंतरही 27 धावांनी हारला.
- प्रथम फलंदाजी करताना अॅडिलेड स्ट्राइकर्सने 20 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 170 धावा कुटल्या.
- उत्तरात मेलबर्नसंघाने 15.3 षटकांत 143 धावाच करू शकला.
गेलची खेळी बॉल बाय बॉल...
बॉल | रन |
1 | 2 |
2 | 0 |
3 | 6 |
4 | 6 |
5 | 6 |
6 | 6 |
7 | 2 |
8 | 6 |
9 | 6 |
10 | 4 |
11 | 1 |
12 | 6 |
टोटल- 12 बॉल | 51 रन
|
पुढील स्लाइड्सवर पाहा, गेल आणि युवीच्या खेळीतील रोमांचक Photo's आणि युवराजचे ट्वीट...