आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Funny Comment On Indian Opener Rohit Sharma On Social Sites

युवराजने 'बहिण' रितिकाबरोबर घेतला सेल्फी, उडवली रोहित शर्माची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसेप्शनच्यावेळी रोहित आणि रितिकासह युवराजचा सेल्फी. - Divya Marathi
रिसेप्शनच्यावेळी रोहित आणि रितिकासह युवराजचा सेल्फी.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज ऑलराउंडर युवराजसिंगने ओपनर बॅट्समन रोहित शर्माची सोशल साइट्सवर ट्विट करून खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे, जो फोटो शेअर करून त्याने फनी कमेंट केले आहे, त्यात रोहित आणि त्याची होणारी पत्नी रितिका सजदेहदेखील आहे. युवीने लिहिले आहे, "Hey @ritssajdeh who's this guy at the back! looks like the dude from Amazon haa aaa aaa aaa haa aaa aa a @ImRo45 😆😆💏.' रोहित शर्मा आणि रितिका हरभजनसिंग आणि बॉलीवुड स्टार गीता बसरा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी दिल्लीत होते. युवीने तेथेच आपली मानलेली बहिण आणि सहकारी क्रिकेटर रोहितसह सेल्फी घेतला.
13 डिसेंबरला मुंबईत करणार लग्न
रोहित 13 डिसेंबरला रितिका सजदेहबरोबर लग्न करणार आहे. रोहितच्या एका जवळच्या व्यक्तीने या लग्नाची पुष्टी केली आहे. रोहित सध्या द. आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत व्यस्त आहे. टेस्ट मालिका 7 डिसेंबरला संपणार आहे. यानंतर टीम इंडिया जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया टूरवर जाईल. तेथे 5 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले जातील. या दरम्यान रोहितकडे साधारणपणे एक महिण्याचा अवधी असेल. रोहितचा विवाह बांद्रा (मुंबई) च्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजचे मानलेली बहिण रितिकाबरोबरचे फोटोज...