आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-8 मधील सर्वात महागड्या युवराजला दिल्लीने दाखवला घरचा रस्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 2016 ला सुरुवात झाली नाही तोच युवराजसिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इशांत शर्मा यांना जबरदस्त हादरा बसला. आयपीएल 9 साठी दिल्ली डेयरडेविल्सने युवराजला, किंग्स इलेवन पंजाबने सेहवागला आणि सनरायजर्स हैदराबादने इशांतला घरचा रस्ता दाखवला आहे. आता यांचे भविष्य 9 फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावातच निश्चित होईल. मागील सिझनमध्ये दिल्लीने युवराजला 16 कोटींमध्ये विकत घेतले होते.
आयपीएल संघांनी कुणाला दाखवला घरचा सस्ता आणि कुणाला दिली संधी...
- 6 संघांनी 37 विदेशी खेळाडूंसह एकूण 101 खेळाडूंना संधी दिली आहे.
- 24 विदेशी खेळाडूंसह 61 खेळाडूंना संघांनी बोलीपासून बाहेर ठेवले.
- आयपीएल 2016 साठी खेळाडूंचे संघातील स्थान निश्चित करण्याची मुदत 31 डिसेंबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होती.

स्टेन आणि इशांतलाही दाखवला घरचा रस्ता
हैदराबादने डेल स्टेन आणि इशांत शर्मासह नऊ खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला.
मुंबई इंडियंसने खर्च केले 51.56 कोटी
- मुंबई इंडियंसने आतापर्यंत सर्वाधिक 51.56 कोटी रुपये खर्च केले असून, आता त्यांच्याकडे लिलावासाठी केवळ 14.40 कोटीच शिल्लक आहेत.
- दिल्ली डेअरडेविल्सकडे सर्वाधिक 36.85 कोटीरुपये शिल्लक आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या फ्रेंचायझीने कुणाला घेतले संघात अन् कुणाला दाखवला बाहेरचा रस्ता...
बातम्या आणखी आहेत...