आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Of The Sunrisers Hyderabad Tie Shoes Lace Of Rishabh Pant Of The Delhi Daredevils

IPL-10: दिल्लीने जिंकली मॅच, पण या कृतीमुळे युवराजने जिंकले सर्वांचे मन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषभ पंतच्या बुटाची लेस बांधताना युवराज सिंग - Divya Marathi
ऋषभ पंतच्या बुटाची लेस बांधताना युवराज सिंग
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या 40 व्या मॅचमध्ये दिल्ली डेयरडेविल्सच्या टीमने सनरायजर्स हैदराबादला 6 विकेटने हरविले. या मॅचमध्ये हैदराबादकडून युवराज सिंगने शानदार फिफ्टी मारत 41 बॉलमध्ये 70* धावांची खेळी केली. यानंतरही त्याची टीम मॅच हारली. मात्र, मॅच दरम्यान त्याने असे काही केले की, सर्वांची मने त्यांनी जिंकली. ज्यूनियर क्रिकेटरचे बांधले शू-लेस....
 
- मॅचमध्ये दिल्लीची इनिंग दरम्यान युवराज सिंग क्रिकेटर ऋषभ पंतच्या बुटाचे लेस बांधताना दिसला. 
- खरं तर पंत युवीपेक्षा खूपच ज्यूनियर खेळाडू आहे. क्रिकेट मॅच दरम्यान धावा काढताना फलंदाजांच्या शू-लेस सुटणे ही सामान्य बाब आहे.
- ज्यानंतर तेथे जवळ असलेल्या खेळाडूकडून बांधून घेतो. मात्र, असे खूप कमी वेळा घडते की, जेव्हा सिनियर क्रिकेटर ज्यूनियर खेळाडूच्या बुटाची लेस बांधतो.
- मात्र, मंगळवारी रात्री सीनियर क्रिकेटर युवीने आपल्यापेक्षा खूपच ज्यूनियर क्रिकेटरची शू-लेस बांधताना दिसला.
-आपल्या माहितीसाठी हे की, ऋषभ, युवराजपेक्षा तब्बल 17 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे ही गोष्ट करताच युवीने हजारो उपस्थित लोकांची व टीव्हीवर करोडो प्रेक्षकांचे मन जिंकले. 
 
असा होता मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना हैदराबादच्या टीमने युवराज सिंग (70*) च्या अर्धशतकाच्या मदतीने 20 षटकात 3 विकेट गमावत 185 धावा केल्या. 
- उत्तरादाखल दिल्लीच्या टीमने 19.1 षटकात 189/4 धावा बनवत मॅच जिंकली. मोहम्मद शमी (2/36 विकेट) च्या शानदार बॉलिंगमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' निवडले गेले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅचदरम्यान झालेल्या या इन्सीडेंट आणि युवराजच्या इनिंगचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...