आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Said How He Crack 6 Sixer On 6 Balls In T20

9 वर्षांनी युवराजने केला खुलासा, सांगितले- रागात कसे मारले होते 6 सिक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टी20 च्या इतिहासात पहिल्यांदाच सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारणाऱ्या युवराजसिंगने तब्बल नऊ वर्षांनी खुलासा केला आहे, की त्या सामन्यात सहा सिक्स मारण्यामागचे कारण काय होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले, की इंग्लंडचा बॉलर अॅंड्य्रू फ्लिंटॉफसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर मला प्रचंड राग आला. त्यानंतर रागात मी सहा सिक्स मारले. वाचा काय झाले होते त्या सामन्यात युवराज आणि फ्लिंटॉपमध्ये...

- युवराजने सांगितले, की फ्लिंटॉपशी झालेल्या भांडणाचा मला फायदा झाला. मला राग आला. मला प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारायचा होता.
- मला सिक्सच मारायचा आहे, असा मी विचार केला नव्हता. पण मी पूर्ण ताकदीनिशी शॉट मारले. माझ्या सुदैवाने सगळे सिक्स गेले.
- 18 व्या ओव्हरच्या सुरवातीला युवराज आणि फ्लिंटॉफ यांच्यात वादावादी झाली होती.
- 17 वा ओव्हर फ्लिंटॉफने टाकला होता. त्यात युवराजने दोन फोर मारले होते. त्यामुळे फ्लिंटॉफने युवराजशी वाद घातला होता.
वाचा दोघे काय म्हणाले होते एकमेकांना
फ्लिंटॉफ- ते खुपच खराब शॉट होते... (शिवी देत बोलला.)
युवराज- तुच खराब आहेस... (त्यानेही शिवी दिली.)
फ्लिंटॉफ- कायम म्हणालास?
युवराज- तू ऐकले न मी काय म्हटले ते...
फ्लिंटॉफ- मी तुझा गळा चिरेल...
युवराज- माझ्या हातातली बॅट बघितली. मोठमोठे शॉट मारुन मी तुला कुठे कुठे पोहोचवू शकतो.
पुढील स्लाईडवर बघा, युवराजसिंगने कसे मारले होते सहा बॉलमध्ये सहा सिक्स... वाचा संपूर्ण वर्णन....