आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराज म्हणाला, आता मी संघाच्या रिस्थितीनुसार खेळतो, कामगिरी महत्त्वाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मी आता संघाच्या गरजेनुसार, परिस्थितीनुसार खेळणे शिकलो आहे, असे पाकिस्तानविरुद्ध २४ धावांची संयमी खेळी करून विजयात योगदान देणाऱ्या युवराजसिंगने सांगितले. पाकविरुद्धसुद्धा मी स्थिती बघून खेळलो, असे तो म्हणाला.

युवराजने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर ६ विकेटने मिळालेल्या विजयाबद्दल सोमवारी बीसीसीआय टीव्हीशी मनोगत व्यक्त केले. युवराज म्हणाला, "मी योग्य गोष्टीवर लक्ष देत होतो. मी फक्त चेंडूवर लक्ष देऊन स्ट्राइक रोटेट करण्यावर जोर देत होतो. मी असे करण्यात यशस्वी ठरलो याचा मला आनंद आहे. दुर्दैवाने मी सामन्यात शेवटपर्यंत खेळू शकलाे नाही.
कोहली शानदार फॉर्मात आहे आणि धोनीने नंतर येऊन सामना संपवला. काही चेंडू खेळल्यानंतर मोठे फटके मारणे हे माझे काम होते. संघावर दबाव येऊ द्यायचे नव्हते, असेही युवराजने नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...