आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yuvraj Singh Will Bring More Laurels To India With His Abilities Says Sachin Tendulkar

सचिनने या कारणामुळे दिल्या युवराजला शुभेच्छा... आहे खास गोष्ट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने त्याच्या फेसबुक वॉलवर हा फोटो शेअर केला. - Divya Marathi
सचिनने त्याच्या फेसबुक वॉलवर हा फोटो शेअर केला.
स्पोर्टस डेस्क - भारताचा मास्टर ब्लास्टर, अवघ्या क्रिकेट चाहत्यांचा लाडका सचिन तेंडुलकरने नुकत्याच त्याच्या FB वॉलवरून युवराज सिंहला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला कारणही खास आहे...
- युवराजला झालेल्या कॅन्सरबाबत तर क्रिकेट चाहत्यांना ठाऊकच असेल. या जीवघेण्या कर्करोगावर युवराजने अक्षरश: लढूनच मात केलीये. त्याच्या या अनुभवांवर आधारित पुस्तकही प्रसिद्ध आहे. एवढे सगळे होऊनही युवराज पुन्हा उभा राहिला, नव्हे संघातही त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून स्थान मिळवले. तर अशा लढवय्या युवराजच्या 300व्या एकदिवसीय सामन्याला साक्षात त्याच्या देवाने म्हणजे दस्तुरखुद्द सचिनने शुभेच्छा दिल्या. तथापि, या 300व्या वनडे सामन्यात युवराजला फलंदाजीची संधी मात्र मिळाली नाही.
- युवराजचे कौतुक करताना सचिन म्हणतो, युवराजचे भारतीय संघात पुनरागमन एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. अनेक अडथळ्यांना तोंड देत युवराजने त्याच्या कारकीर्दीतला 300वा वनडे खेळलाय. मी भावुक झालोय. त्याचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. तरीही युवीने आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर त्याच्या धीरोदात्तपणा आणि परिपूर्ण संतुलन कायम ठेवले. युवी त्याच्या कौशल्याने यापुढेही भारतासाठी विजय खेचून आणत राहील.
- सचिन आणि युवराजची ही मैत्री कुणालाही हेवा वाटावा अशीच आहे.
 
हेही जरूर वाचा
बातम्या आणखी आहेत...