आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक मॅचमधील झहीर व तरूणीचा तो \'फ्लाईंग किस\' आठवतोय का? पाहा VIDEO....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झहीर आणि फॅन तरूणीचा मैदानावरील फ्लाईंग किसचा तो क्षण... - Divya Marathi
झहीर आणि फॅन तरूणीचा मैदानावरील फ्लाईंग किसचा तो क्षण...
स्पोर्ट्स डेस्क- झहीर खानला टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी निवडले गेले असले तरी त्यावरून आता वाद सुरु आहेत. येत्या 22 जुलै रोजी बीसीसीआयच्या प्रशासकीय समिती आणि रवी शास्त्रींच्या बैठकीनंतर राहुल द्रविड आणि झहीर खानच्या जबाबदारीबाबत निर्णय होईल. झहीर भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारतीय क्रिकेटला त्याने दिलेले योगदान सर्वांना कायमच स्मरणात राहिल. तो भारतीय वेगवान बॉलरमध्ये दुसरा यशस्वी बॉलर आहे. मैदानावर गंभीर मुद्रेत दिसणारा झहीर, मैदानाबाहेर मात्र अनेकदा मस्ती करताना दिसून आला आहे. त्याचे मस्ती करतानाचे बरेच फोटोज इंटरनेटवरही व्हायरल झाले आहेत.
 
एकदा तर तो मैदानावरच एका महिला फॅन्सबरोबर मस्ती करताना दिसून आला होता. त्याला या मुलीनेच आधी Flirt करायला सुरूवात केली होती. त्यानंतर झहीर आणि युवराजही त्या मुलीची गंम्मत घेताना दिसले होते. तो व्हिडिओ मॅच दरम्यान अनेकांनी पाहिला असेल.
 
...आणि युवीच्या सांगण्यावरून झहीर तरूणीला दिला फ्लाईंग किस-
 
जून 2011 मध्ये पाकिस्तानविरूद्धच्या एका कसोटी सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने 'झहीर आय लव यू' असे पोस्टर लिहून आणले होते. मात्र जेव्हा स्टेडियमवरील स्क्रिनवर ही मुलगी पोस्टरसह झळकली तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्याकडे खिळल्या. कॅमेरा त्या मुलीवर जाताच ती ही लाजली. ड्रेसिंग रुममध्ये बसलेला झहीर खान त्या मुलीला पाहून आर्श्चयचकीत झाला. मूळचाच लाजाळू स्वभावाचा झहीरने स्क्रिनवरील तो क्षण पाहून बारीक स्मिथ हास्य करत लाजला व संकोचला. 
 
त्यावेळी झहीरच्या शेजारी बसलेल्या युवराज सिंगने त्याला मुलीला किमान हात तरी दाखव असे सांगितले. त्यावर झहीर हसला आणि महिला फॅनसाठी हात हालवत आभार मानले. त्यावर त्या महिलेने एक पाऊल पुढे टाकत झहीरला फ्लाईंग किस दिला. हे पाहून झहीरने लाजून मानच खाली घातली. युवराजच्या सांगण्यावरून मग झहीरनेही त्या मुलीला फ्लाईंग किस दिला. पुढे या घटनेचा व्हिडिओ यु-ट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा झहीर आणि त्या मुलीचे Flirting आणि मैदानावरील फ्लाईंग किसचा तो Video...