आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला मिळू शकतो नवा बॉलिंग कोच, झहीर खानचे नाव आघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीसोबत झहीर खान... - Divya Marathi
विराट कोहलीसोबत झहीर खान...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियासाठी नव्या वेगवान गोलंदाजी कोचची मागणी होत आहे. भारतीय संघाचे मुख्य कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने हैदराबादेत प्रशासकीय समिती (सीओए) आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही मागणी केली. हैदराबादेत झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी, संयुक्त सचिव अमिताभ चौधरी, कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी हजर होते. यादरम्यान, भारताचा ऑफस्पिनर हरभजनसिंगने या कामासाठी झहीर खान सर्वांत योग्य असल्याचे ट्विट केले आहे. गोलंदाजीचे त्याचे ज्ञान जबरदस्त आहे, असे भज्जीचे म्हणणे आहे. 
 
झहीर खान का योग्य पर्याय आहे? : 
 
झहीर आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करतो. त्याने ११ सामन्यांत १० गडी बाद केले. जहीरने ९२ कसोटींत ३११ बळी आणि २०० वनडेत २८२ बळी घेतले आहेत. कुंबळेलासुद्धा जहीर योग्य पर्याय वाटतो. 
 
झहीर खानची वैशिष्ट्ये : 
 
१.रिव्हर्स स्विंग करण्यात तरबेज. 
२. स्विंग गोलंदाजीत अत्यंत यशस्वी. 
३. यॉर्कर चेंडूचा महारथी. 
४. गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यास नेहमी तयार असतो. 
५. २०११ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा तो मुख्य गोलंदाज होता. सोबत तो इतर गोलंदाजांना मार्गदर्शन करायचा.  
 
झहीर म्हणाला, तर मी तयारच... 
 
बीसीसीआयने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी तर तयार बसलो आहे. मला संधी मिळाली तर टीम इंडियाला सेवा देऊ शकेन. मला आधीसुद्धा ऑफर नक्की आली होती. तेव्हा मी डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व करण्यास इच्छुक होतो, असे झहीरने म्हटले आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, बॉलिंग कोच म्हणून कोण कोण आहे दावेदार....
बातम्या आणखी आहेत...