आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वे, वेस्ट इंडीजसारख्या देशांपुढे आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व गमावण्याचा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - पारदर्शी कारभाराचे वारे सध्या आयसीसीमध्येही वाहत असून पूर्ण सदस्यत्व असणाऱ्या देशांनी, निष्क्रिय राहिल्यास किंवा आर्थिक अनुदानाच्या विनियोगाची कागदपत्रे योग्य व समाधानकारकरीत्या सादर न केल्यास त्यांना सहसदस्य देशाचा दर्जा देऊन पदावनीत करण्यासंबंधीचा प्रस्ताव आयसीसीने विचाराधीन असल्याचे सदस्यांना कळविले आहे. त्यामुळे या क्रिकेट मंडळांना अापल्या कार्यपद्धतीमध्ये लवकरच बदल अाणावा लागणार अाहे. तसेच कामकाजामध्येही पारदर्शकता अाणण्यासाठी या मंडळांना काम करावे लागणार असल्याचेही दिसते. 
 
उदाहरणार्थ झिम्बाब्वे किंवा वेस्ट इंडीज बोर्डासारख्या निष्क्रिय क्रिकेट बोर्डांनी कंबर न कसल्यास त्यांना खालच्या दर्जावर पाठविले जाऊ शकते. तसेच सहसदस्य देशांचा दर्जा असलेल्या व उत्तम कामगिरी व पारदर्शी कारभार करणाऱ्या दोन देशांना पूर्व सदस्यत्व मिळू शकेल. त्यासंबंधीचा प्रस्ताव भविष्यकाळात मंजूर झाल्यास पूर्ण सदस्यत्व असणाऱ्या निष्क्रिय देशांचा क्रिकेट बोर्डांना धोका संभवतो. त्यांचे अनुदान कमी होईलच, शिवाय पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा गेल्यामुळे त्यांना सहसदस्य देशांसोबत स्पर्धा करून मुख्य स्पर्धांमध्ये यावे लागेल.
 
आळस घालवण्यासाठी समिती
‘बिग थ्री’ मॉडेल ज्या पद्धतीने याेग्यरित्या मोडून काढण्यात आले तसेच पूर्ण सदस्यांचा आळस घालवण्यासाठी सदस्यत्व समितीची स्थापना करण्यात येईल व त्यावर सहसदस्य देशांच्या प्रतिनिधीलाही स्थान देण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...