आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिम्बाब्वेचा मालिका विजय; श्रीलंकेवर मात, मस्कदझाचे अर्धशतक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंबनटाेटा -सलामीवीर मस्कदझा (७३) अाणि साेलाेमाेन मिरेने (४३) झंझावाती फलंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेला साेमवारी यजमान श्रीलंकेवर मालिका विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेने पाचव्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंकेला धूळ चारली. पाहुण्या झिम्बाब्वेने ३ गड्यांनी सामना जिंकला. यासह झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका ३-२ ने अापल्या नावे केली.   
 
दानुष्का गुणथिलका (५२) अाणि असेला गुणारत्नेच्या (५९) खेळीमुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेसमाेर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मस्कदझा वमिरेने झिम्बाब्वेला ३८.१ षटकांत ७ गड्यांच्या माेबदल्यात विजय मिळवून दिला. यासह झिम्बाब्वेने मालिका जिंकली.  
 
मस्कदझा-मिरेची भागीदारी :   मस्कदझा अाणि साेलाेमाेन मिरेने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी संघाला ९२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.  मिरेने ३२ चेंडूंत ५ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ४३ धावांची खेळी केली.   
 
सिकंदरची अष्टपैलू कामगिरी : विजेत्या झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने अष्टपैलू खेळी करून विजयश्री खेचून अाणली. त्याने गाेलंदाजीत तीन बळी घेतले. तसेच फलंदाजी करताना नाबाद २७ धावांची खेळी करून टीमचा विजय निश्चित केला.
 
मस्कदझाचे अर्धशतक
झिम्बाब्वेच्या विजयाचा हीराे मस्कदझाने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ८६ चेंडूंत ७३ धावा ठाेकल्या. यात ९ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने मिरेसाेबत अर्धशतकी भागीदारी रचली.   
बातम्या आणखी आहेत...