आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गीता बसरा- हरभजनचे 8 वर्षे चालले अफेयर, कोणालाही नव्हता थांगपत्ता!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता आणि हरभजनने अनेक काळ डेटिंग केल्यानंतर ऑक्टोबर, 2015 मध्ये लग्न केले. - Divya Marathi
गीता आणि हरभजनने अनेक काळ डेटिंग केल्यानंतर ऑक्टोबर, 2015 मध्ये लग्न केले.

स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंगने पत्नी गीता बसराचा मंगळवारी 34 वा बर्थडे सेलिब्रेट धुमधडाक्यात साजरा केला. गीताचा जन्म ब्रिटनमध्ये झाला, मात्र तिने अॅक्टिंगमधील करियर बॉलिवूडमध्ये बनवले. गीता आणि हरभजनने अनेक काळ डेटिंग केल्यानंतर ऑक्टोबर, 2015 मध्ये लग्न केले. हा ग्रॅंड वेडिंग इव्हेंट्स पाच दिवस चालला होता. करियरपेक्षा लव लाईफमुळे जास्त चर्चेत...

 

- गीता बसरा आपल्या अॅक्टिंग करियरपेक्षा जास्त क्रिकेटरसोबत डेट करत असल्याने चर्चेत राहिली. दोघांचे अफेयर सुमारे 8 वर्षे चालले.
- सर्वात आधी हरभजनने गीताला एका क्रिकेट मॅच दरम्यान स्टेडियमवर पाहिले होते. यानंतर एका कॉमन फ्रेंडने दोघांची भेट घडविली होती.
- 2008 मध्ये दोघांच्या अनेक सिक्रेट मिटिंगच्या न्यूज चर्चेत आल्या होत्या. मात्र, त्यावेळी दोघांनीही अफेयरच्या बातम्या उडवून लावल्या होत्या.
- गीता-हरभजन यानंतर कधी फिफा वर्ल्ड कप पाहायला गेले तर कधी फॉर्म्यूला वन रेस. अखेर, कपलने 29 ऑक्टोबर, 2015 रोजी लग्न केले.
- जुलै, 2016 मध्ये गीताने लंडनमध्ये मुलगी हिनायाला जन्म दिला होता. मूळ भारतीय असलेल्या गीताची फॅमिली लंडनमध्ये राहते.

 

2006 मध्ये सुरु झाले अॅक्टिंग करियर-

 

- गीता बसराचे अॅक्टिंग करियर 2006 मध्ये फिल्म ‘दिल दिया है’ पासून सुरु झाले होते.
- मात्र तिला बॉलिवूडला जास्त यश मिळाले नाही. 2006 पासून 2016 पर्यंत गीताचे फक्त 7 चित्रपट आले. ज्यात एक पंजाबी चित्रपट होता.
- तिची अखरेची बॉलिवूड फिल्म 2015 मध्ये ‘सेकंड हॅंड हसबंड' होती. गीता आता अॅक्टिंगपासून दूर आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गीता बसराच्या अॅक्टिंग करियरमधील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...