आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी : भारताची मलेशियावर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - सलामीच्या पराभवातून सावरलेला भारतीय पुरुष संघ चार देशांच्या हाॅकी मालिकेत गुरुवारी विजयी ट्रॅकवर परतला. भारताने स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात मलेशियावर मात केली. भारताने रंगतदार सामन्यात ४-२ अशा फरकाने विजय मिळवला.
निकिन थिमैयाने (२४, ५५ वा मि.) गाेलचा डबल धमाका उडवून भारताला विजय मिळवून दिला. याशिवाय अाकाशदीप सिंग (५६ वा मि.) अाणि रूपिंदर पाल सिंग (४० वा मि.) यांनीही संघाच्या विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. तसेच मलेशियाकडून फैजल सारी (३९ वा मि.) अाणि शहरील साबाह (४७ वा मि.) यांनी गाेल केले. मात्र, इतर खेळाडू सपशेल अपयशी ठरले.
भारताचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. यासह भारताने स्पर्धेत एका गुणांची कमाई केली. अाता भारताचा स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी न्यूझीलंडशी हाेईल. यापूर्वी, यजमान अाॅस्ट्रेलियाने सलामीला भारतावर मात केली हाेती.

निकिन थिमैय्याने भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने २४ व्या मिनिटाला सामन्यात गाेलचे खाते उघडले. यासह भारताने सामन्यात १-० ने अाघाडी मिळवली. त्यानंतर १५ मिनिटांत मलेशियाने लढतीत बराेबरी साधली. फैजल सारीने गाेल करून संघाला बराेबरी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर एका मिनिटात रूपिंदरपालने भारताची २-१ ने अाघाडी निश्चित केली. शहरीलने मलेशियाकडून दुसरा गोल केला.
बातम्या आणखी आहेत...