आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हॉकी\'मध्ये भारताचा 61 वर्षांतील मोठा विजय, मात्र क्रिकेटमध्ये 39 वर्षांतील लाजिरवाणा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - रविवारी लंडनमध्ये एकीकडे हॉकीमध्ये भारताने पाकवर मोठा विजय मिळवला, तर क्रिकेटमध्ये लाजिरवाणा पराभव झाला. १९७८ पासून दोन्ही देश वनडे खेळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत टीम इंडियाला ३९ वर्षांतील लाजिरवाणा म्हणजे तब्बल १८० धावांनी पराभव चाखावा लागला. पाकचे ३३९ धावांचे आव्हान पेलताना भारतीय संघ ३०  षटकांत १५८ धावांवर आटोपला. दुसरीकडे हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारताने पाकला ७-१ने पराभूत करून ६१ वर्षांतील सर्वात मोठा विजय नोंदवला. 
 
हॉकी : भारत उपांत्यपूर्व फेरीत
-हॉकी वर्ल्ड लीगच्या सामन्यात पाकला ७-१ने पराभूत केले. ६१ वर्षांत पाकवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय.
-स्पर्धेत भारताचा सलग तिसरा विजय, तर पाकचा तिसरा पराभव आहे. 
-हा १६८वा भारत-पाक हॉकी सामना होता. त्यात पाकला ५६ वेळा पराभूत केले आहे.
-हरमनप्रीत, तलविंदर व आकाशदीपसिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
-भारताने तीन सामन्यांत ९ गुण मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 
पराभवाचे मूळ : विराटची नाणेफेक, बुमराहचा नो बॉल, ५४ धावांवर ५ विकेट
असा झाला पराभव : बुमराहच्या चेंडूवर फखर बाद झाला. मात्र, तो नो बॉल होता. नंतर फखरने शतक फटकावले. फलंदाजी करताना पहिल्या ५ षटकांत रोहित व विराट बाद झाले. ही पराभवाची कारणे.
नशिबाची पाकला साथ : पाकला एक चौकार चेंडू हेल्मेटला लागल्याने मिळाला. बुमराहचा एक चेंडू ४८.२ व्या षटकात स्टम्पला लागला, मात्र बेल्स न पडल्याने हाफिज नाबाद राहिला. 
 
पाकला मिळाले हे लाभ
करंडक आणि १४.१८ कोटी रुपयांचे बक्षीस.
-प्लेअर ऑफ द फायनल : फखर जमान.
-प्लेअर ऑफ द टुर्नामंेट : हसन अली.
-गोल्डन बॉल : हसन अली (१३ विकेट)
 
...आणि भारताला 
उपविजेतेपद आणि ७.०९ कोटी रुपये.
- गोल्डन बॅट : शिखर धवन (३३८ धावा)
- आयसीसी स्पर्धेच्या फायनलमधील हा सर्वात मोठा पराभव. यापूर्वी २००३ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने १२५ धावांनी हरवले होते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>पाकमध्ये ८ दिवस आधीच ईद
​>भारताचा दबदबा कायम... 
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...