आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एकट्या कुंबळेनीच आऊट केली पाकिस्तानी टीम, 19 वर्षापूर्वी केला होता पराक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंबळेने 1999 मध्ये दिल्ली कसोटीत एका डावात 107 धावा देत सर्व 10 विकेट घेतल्या होत्या. - Divya Marathi
कुंबळेने 1999 मध्ये दिल्ली कसोटीत एका डावात 107 धावा देत सर्व 10 विकेट घेतल्या होत्या.

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेट संघाचा विक्रमवीर लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे 7 फेब्रुवारी 1999 रोजी कुंबळेने क्रिकेट विश्वातील एका अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली होती. पाकिस्तानविरूध्दच्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळलेल्या त्या कसोटीत कुंबळेने डावातील सर्वच्या सर्व 10 गडी बाद करण्याची कमाल केली होती. इंग्लिश खेळाडू जिम लेकर नंतर तो दुसरा असा गोलंदाज ठरला होता ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या दहाच्या दहा फलंदाजानां टिपले. कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कुंबळेच्या अविस्मरणीय गोलंदाजीचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...