आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love Story: Boxer Vijender Singh Married Long Time Girlfriend Who Is Minister Daughter

LOVE STORY: सामान्य असताना थेट मंत्र्याची पोरगी पटवली, सेलिब्रिटी होताच मिळाला होकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आर्चना सिंहसोबत विजेंदर - Divya Marathi
पत्नी आर्चना सिंहसोबत विजेंदर

स्पोर्ट्स डेस्क- सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यानिमित्ताने आपण काही खेळाडूंच्या लव्हस्टोरीवर प्रकाश टाकत आहोत. भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग याच्या लव्हस्टोरीबाबत वाचणार आहोत. विजेंदरने बॉक्सिंगसोबतच अॅक्टिंग क्षेत्रातही नशिब आजमले आहे. पण विजेंदरचे खासगी आयुष्यही एखाद्या बॉलिवूड स्टोरीला कमी नाही. एका बड्या काँग्रेस नेत्याची मुलगी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे समोर आल्यानंतर तो चर्चेत आला होता. नंतर 2008 मध्ये ऑलिंपिक मेडल जिंकणारा हा खेड्यागावातील मुलगा अचानक सेलिब्रिटी बनला होता. गर्लफ्रेंडला बनवले साथीदार...

 

- विजेंदरची गर्लफ्रेंड ही एका हरयाणातील एका मंत्र्यांची मुलगी होती. काँग्रेस नेते सुरिंदर सिंह यांची मुलगी अर्चना त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड राहिली.
- काँग्रेस नेते सुरिंदर सिंह हे हरयाणात मंत्री राहिले आहेत. मात्र, अर्चना लहानाची मोठी दिल्लीत झाली. 
- विजेंदर सामान्य घरातील होता पण बॉक्सिंगमध्ये नाव कमाविल्यानंतर अर्चनाच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.
- अर्चना व विजेंदर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. उच्चशिक्षित असलेली अर्चना सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे.
- 17 मे, 2011 रोजी विजेंदरने आपली जुनी मैत्रिण आणि गर्लफ्रेंड असलेल्या अर्चना सिंहसोबत लग्न केले.

 

बॉलिवुडमध्येही केला प्रयत्न-

 

- विजेंदरने बॉलिवूड फिल्म 'फगली'मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत काम केले आहे. 
- या फिल्ममध्ये तो एक पोलिस अधिका-याच्या भूमिकेत चमकला होता.
- बॉक्सरशिवाय विजेंदर हरियाणा पोलिसात डीएसपी सुद्धा आहे.

- प्रोफेशनल बॉक्सिंगमध्येही विजेंदरने सर्व सामने नॉक आऊटमध्ये जिंकले आहेत.

 

असे आहे विजेंदरचे करिअर-

 

- कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 मेडल, एशियन गेम्समध्ये 2 मेडल जिंकली. 
- वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिकमध्ये 1-1 मेडल जिंकले. 
- 2009 मध्ये जगातील नंबर वन मिडलवेट (75 किलोग्राम कॅटेगरीत) बॉक्सर राहिला.

 

जेव्हा नॅशनल हिरो ठरला 'व्हिलेन'-

 

- 2013 मध्ये पंजाब पोलिसांनी अर्जुन पुरस्‍कार प्राप्‍त खेळाडू जगदीश सिंह उर्फ भोला याच्या घरातून 130 कोटी रूपयांचे 26 किलो हेरोइन जप्त केले होते. 
- तस्कर अनूप सिंहने दावा केला होता की, विजेंदर सिंह आणि त्याचा मित्र राम सिंहच्या सांगण्यावरूनच ते खरेदी केले होते. 
- पोलिसांच्या चौकशीत विजेंदरचा मित्र राम सिंहने ड्रग्स घेतल्याची कबुली दिली होती. 
- तस्‍करखोराच्या घरी विजेंदरचा फोटो मिळाला. तसेच घराबाहेर त्याच्या पत्नीच्या नावाची रजिस्‍टर्ड कार आढळून आली होती.
- कार तस्‍करखोरांच्या घरी कशी काय गेली असा सवाल उपस्थित झाल्याने विजेंदरच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. मात्र, पुढे हे प्रकरण दाबले गेले.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्टार इंडियन बॉक्सर विजेंदर व अर्चनाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...