आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: रांचीत पोहोचला CSK संघ, ऑडी कार स्वत: ड्राइव्ह करत घरी गेला धोनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रांचीमध्ये ऑडी कार स्वत: ड्राइव्ह करत घरी जाताना एमएस धोनी)
रांची- आयपीएल-8 मधील दुसरा क्वालिफायर सामना खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ रांचीला बुधवारी पोहोचला. कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा देखील आपल्या संघासोबत होता. परंतु, एयरपोर्टवरून तो थेट आपली ऑडी कारमध्ये बसून घरी निघून गेला. विशेष म्हणजे धोनी स्वत: ड्राइव्ह करत होता. त्याच्या शेजारी त्याचे मेव्हणे गौतम गुप्ता बसले होते. तर मागील सीटवर धोनीची पत्‍नी साक्षी आणि मुलगी जीवा होती.

दुसरीकडे, मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत चेन्नई संघातील इतर क्रिकेटपटू लक्झरी बसमधून फाइव्ह स्टार हॉटेल 'रेडिसन ब्लू'मध्ये रवाना झाले.

22 मे रोजी आईपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाईल. या सामन्यात पराभूत संघाला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता धरावा लागेल. धोनीसह ड्वेन स्मिथ, जडेजा, अश्विन, मोहित, मायकल हस्सी, ड्वेन ब्रावो, सुरेश रैना, मोहित शार्मा, फाफ-डु-प्लेसिस, नेगी, आशिष नेहरा आणि टीममधील सर्व क्रिकेटपटू जेएससीए स्टेडियमवर गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून नेट प्रॅक्टिीस करतील.

धोनी... धोनी...च्या घोषणांनी गुंजला एअरपोर्ट परिसर
स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी रांचीला पोहोचणार असल्याची माहिती आधीच चाहत्यांना मिळाली होती. धोनीला पाहाण्यासाठी एअरपोर्टवर चाहते मोठ्या संख्येने आले होते. एअरपोर्ट टर्मिनलमधून धोनीला बाहेर पडताना पाहाताच चाहत्यांनी 'धोनी... धोनी...'च्या घोषणा दिल्या. दुसरीकडे, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयएसएफ व रांची पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो... (छायाचित्रकार : आसिफ नईम)