आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आता प्रतिक्षा सहन होत नाही\'; क्रिकेटर सुरेश रैनाने केले \'TWEET\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सुरेश रैना सध्या आयपीएल-8 मध्ये व्यग्र आहे. यादरम्यान, रैनाचे टि्‍वटर अकाउंटवर आपल्या मनात होत असलेली घालमेल व्यक्त केली आहे. रैनाने पत्नी प्रियांकाचा एक फोटो शेअर केला असून 'आता प्रतिक्षा सहन होत नाही', असा मेसेजही लिहिला आहे.

रैना आणि प्रियांकाचा विवाह गेल्या 3 एप्रिलला झाला होता. मात्र, त्यानंतर लगेचच 8 एप्रिलपासून सुरु झालेल्या आयपीएलनिमित्त रैनाला घराबाहेर पडावे लागले.

सुरेश रैनाचे 'ट्वीट' जसेच्या तसे...
@ImRaina 'Can't wait to see u my love.'
विवाहानंतर लगेचच रैना आणि प्रियांका आपापल्या प्रोफेशनल लाइफमध्ये गुंतून गेले आहेत. रैना आयपीएलमध्ये तर प्रियांका नेदरलँडमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे नवदाम्पत्याला एकमेकांना पुरेसा वेळ देणे शक्य झाले नव्हते.

आयपीएलनंतरच रैनाचे 'हनिमून'
आयपीएलचे आठवे पर्व 24 मे रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर टीम इंडिया बांगलादेशाचा दौरा करणार आहे. त्यामुळे बांगलादेशात जाण्यापूर्वी सुरेश रैना हनिमून प्लान करू शकतो. यापूर्वीही रैनाने यासंदर्भात संकेत दिले होते. प्रियांका आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे ती रैनाला चीअर करण्‍यासाठीही येऊ शकली नाही.
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये 22 एप्रिलला दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजेता संघ 24 एप्रिलला होणार्‍या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुरेश रैना आणि प्रियांकाचे निवडक फोटो...