आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CSKकडून RCBचा पराभव, नाराज झाली दिनेश कार्तिकची प्रेयसी, अनुष्काही गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पल्लीकर - Divya Marathi
दीपिका पल्लीकर
रांची- चेन्नई सुपर किंग्जने (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB)तीन गड्यांनी मात केली. CSKने या विजयासह थेट फायनलमध्ये धडक दिली आहे.

RCB ने CSK विरुद्ध सामना गमावल्याने अनेकांना नाराज केले आहे. RCBचा विकेटकिपर दिनेश कार्तिकची प्रेयसी आणि स्क्वाश स्टार दीपिका पल्लीकल ही देखील नाराज दिसली. दीपिकाचे नाराज होणे स्वाभाविक आहे म्हणा, कारण तिचा भावी पती दिनेश कार्तिक आयपीएलच्या या मोसमात सपशेल 'फ्लॉप' ठरला. कार्तिकला RCBने एकूण 10.5 कोटी रुपयांत खरेदी केले होते. परंतु त्याला या टूर्नामेंटमध्ये साधी हाफ सेन्चुरीही लगावता आली नाही.

विराटची गर्लफ्रेंडही गायब...
RCB चा कर्णधार विराट कोहलीला प्रत्येक सामन्यात चीअर करण्यासाठी येणारी त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये दिसली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान, अनुष्का दिसली होती. स्टेडियममध्ये अनुष्का आणि दीपिकासोबत होत्या. परंतु, रांचीत खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान दीपिका एकटीच RCBला चीअर करताना दिसली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, RCB ला चीअर करण्‍यासाठी आलेल्या दीपिकाचे फोटो...