आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: धोनीच्या रंगात रंगली साक्षी, पहिल्यांदा दिसला मानेवर \'माही\' टॅटू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी धोनी - Divya Marathi
साक्षी धोनी
कोलकात्याच्या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. साक्षीने पहिल्यांदा आपल्या मानेवर 'माही' नावाचे टॅटू गोंदले होते. साक्षी धोनींच्या रंगात पार रंगून गेली होती. चेन्नईला चीअर करण्यासाठी साक्षी आली होती. विशेष म्हणजे स्टेडियममध्ये धोनीची आई आणि मुलगी जिवा उपस्थित होती.
‘कहीं खुशी कहीं गम’
कोलकात्यात जय-पराजयानंतर ‘कहीं खुशी कहीं गम’चे चित्रही पाहायला मिळाले. मुंबईचा विजय नीता अंबानींच्या चेहऱ्यावरून वाहत होता. दुसरीकडे चेन्नईच्या पराभवाची खंत धोनीची पत्नी साक्षीच्या चेहऱ्यावर होती.
अंजली आणि साराने वेधले लक्ष...
दुसरीकडे, फायनलचा आनंद लुटण्यासाठी सचिनची पत्नी अंजली ही मुलगी सारासह आली होती. या दोघींनी चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

मुंबई इंडियन्स 'चॅम्पियन'
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबई इंडियन्स टीम आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन ठरली. किताब विजेत्या मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबईने 41 धावांनी अंतिम सामना जिंकला. यासह मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. दुसरीकडे पराभवासह चेन्नई टीमचे तिसऱ्यांदा चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, धोनीची कन्या जिवा आणि आईचे फोटो...