आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई इंडियन्स-चेन्नई आज फायनल; ईडन गार्डनवर रंगणार सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध फायनलच्या पूर्वसंध्येला काेलकात्यातील ईडन गार्डनवर फुटबाॅलचा सराव करताना मुंबई इंडियन्स टीमचे खेळाडू. - Divya Marathi
चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध फायनलच्या पूर्वसंध्येला काेलकात्यातील ईडन गार्डनवर फुटबाॅलचा सराव करताना मुंबई इंडियन्स टीमचे खेळाडू.
काेलकाता - आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टीप-२० क्रिकेट स्पर्धेच्या किताबासाठी चेन्नई सुपरकिंग्ज अणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी काट्याची लढत रंगणार आहे. इतिहासिक ईडन गार्डन मैदानावर ही फायनल रंगणार आहे. दाेन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज अणि एक वेळचा विजेता मुंबई इंडियन्स यांच्यातील अंतिम सामना अधिक राेमांचक हाेण्याची शक्यता आहे.

धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने शुक्रवारी विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून फायनलचे तिकीट मिळवले. फायनलचा हा प्रवास पल्ला गाठण्यासाठी चेन्नईला माेठी कसरत करावी लागली. दुसरीकडे राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने प्ले आॅफमध्ये चेन्नईला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदाच्या सत्रात सुरुवातीच्या पाच सामन्यांतील पराभवातून सावरलेल्या मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमनाच्या बळावर अंतिम फेरी गाठली. त्यामुळे या दाेन्ही संघांसाठी हा सामना अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबईला दुसर्‍या किताबाची आशा
राेहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या दुसर्‍या किताबाची आशा अहे. आतापर्यंत मुंबईने २०१३ मध्ये आयपीएलची फायनल जिंकली हाेती. तसेच या टीमला २०१० मध्ये फानयलमधील पराभवाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते. आता मुंबईने तिसर्‍यांदा फायनलमध्ये प्रवेश केला.

चेन्नई तिसर्‍यांदा जेतेपदासाठी सज्ज
चेन्नई तिसर्‍यांदा जेतेपदासाठी सज्ज आहे. या संघाने आतापर्यंत २०१० व २०११ मध्ये अजिंक्यपद जिंकले. आता २०१५ मध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा चेन्नई टीमचा प्रयत्न असेल. चेन्नईने सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नईने २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये हे यश संपादन केले.

दोन्ही संघ असे
मुंबई इंडियन्स
राेहित शर्मा (कर्णधार), सिमन्स, पार्थिव पटेल, अंबाती रायडू, हार्दिक पांड्या, पाेलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लिनघन, हरभजनसिंग, अभिमन्यू मिथुन, पवन सुयाल, आदित्य तारे, जसप्रीत बुमराह, मर्चंड डी लेंगे, श्रेयस गाेपाल, प्रग्यान आेझा, उन्मुक्त चंद, विनयकुमार.

चेन्नई सुपरकिंग्ज
महेंद्रसिंग धाेनी (कर्णधार), डॅवेन स्मिथ, माइक हसी, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, पवन नेगी, ब्राव्हाे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, माेहित शर्मा, आशिष नेहरा, मॅट हेन्री, मिथुन मनहास, काइल अ‍ॅबाेट, राहुल शर्मा, अंकुश बिन्स, एस.बद्री.

मुंबईचे शक्तिस्थान
- पाँटिंग, सचिन, जाॅन्टी ऱ्होड्स, अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली मुंबईची यशस्वी वाटचाल.
- सिमन्स, पार्थिव पटेलची स्टार सलामीची जाेडी आणि मधल्या फळीत माेठ्या खेळीसाठी राेहित शर्मा, अंबाती रायडू, पाेलार्ड हे सर्व सक्षम आहेत.

चेन्नईची मजबूत बाजू
- स्मिथ, हसी, सुरेश रैना, फाफ डुप्लेसिस अणि धाेनीमध्ये तुफानी फलंदाजीची क्षमता अहे.
- मधल्या फळीतला रवींद्र जडेजा आणि डॅवेन ब्राव्हाे संकटमाेचकाच्या भूमिकेसाठी सक्षम आहेत.
- आशिष नेहराने आतापर्यंत २२ विकेट घेऊन दबदबा निर्माण केला.
बातम्या आणखी आहेत...