आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#LIVE #CSKvsMI : सुरुवातीचे चार सामने गमावलेल्या मुंबईने मिळवले विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता : चेन्नईचा 41 धावांनी पराभव करत मुंबईने आयपीएलच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद मिळवले आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करत मुंबईच्या संघाने धोनीच्या चेन्नईवर विजय साकार केला.
मुंबईच्या 202 धावांचा पाठलाग करताना माईक हसी अवघ्या चार धावांवर बाद झाला. मॅक्लेंघनने त्याची विकेट घेतली. त्यानंतर रैनाच्या जोडीने स्मिथने चांगली भागीदारी केली. त्याने अर्धशतक पूर्ण केले. पण 57 धावांवर खेळत असताना मॅक्लेंघनने त्याला बाद केले. त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीला गळतीच लागली. धोनी 18 तर रैना 28 धावांवर बाद झाला. तसेच ब्राव्हो, नेगी आणि डुप्लेसिसही लवकर बाद झाले. त्यामुळे मुंबईचा विजय निश्चित मानला जात आहे. मॅकलेँघनने ३ तर भज्जी आणि मलिंगा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
त्याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि लेंडल सिमन्स यांची अर्धशतके आणि रायडू आणि पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मंबईने चेन्नईसमोर विजेतेपदासाठी 203 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईने पाच विकेट गमावत हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
पहिल्या विकेटनंतर रोहित मैदानावर आला. सिमन्सच्या जोडीने त्याने चांगली फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. सिमन्स आणि रोहित दोघांनीही त्यांची अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर रोहित आणि सिमन्सहील एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर मैदानावर पोलार्ड आणि रायडूू होते. दोघांनीही अंतिम सामन्याचे महत्त्व लक्षात घेतल जोरदार फलंदाजी केली. पोलार्डने 18 चेंडुंच्या मोबदल्यात 36 धावा केल्या. तर रायनेही 24 चेंडुंमध्ये 36 धावा केल्या. त्याजोरावर मुंबईने 5 बाद 202 अशी मजल मारली.
चेन्नईने जिंकला टॉस
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आठव्या सीझनचा अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना ईडन गार्डन मैदानावर खेळला जातोय. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्सचे कर्णधार विराट कोहलीने ट्वीटवरवर ट्वीट करून दोन्ही संघांना 'ऑल द बेस्ट' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. चेन्नई 2010 आणि 2011 मध्ये लगातार दोन वेळा विजयी संघ ठरला आहे. तर दुसरीकडे मुंबईने 2013 मध्ये विजय मिळवला होता.
आतापर्यंत मुंबई तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतीम सामन्यापर्यंत पोहोचली आहे, तर 2010 मध्ये मुंबई उपविजेता टीम ठरली होती. चेन्नईने दुसऱ्या क्वालीफायरमधअये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला नॉकआऊट करत अंतीम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. ही आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्जसाठी सहाव्यांदा अंतिम सामन्यात जाण्याची संधी आहे. 2008, 2010, 2011, 2012, 2013 आणि आता 2015 मध्ये आयपीएलचा अंतीम सामना आहे.
TOP 11
चेन्नई सुपर किंग्स :
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ड्वेन स्मिथ, फॉफ डु प्लेसिस, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, रविचंद्रन अश्विन, मोहित शर्मा, आशीष नेहरा, पवन नेगी, माइकल हसी
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमंस, अंबाती रायुडू, पार्थिव पटेल, कीरन पोलार्ड, लसिथ मलिंगा, हरभजन सिंह, मिचेल मॅक्लिंघन, हार्दिक पांड्या, जगदीश सुचित, विनय कुमार