आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • LIVE IPL 8, Qualifier 2: Chennai Super Kings V Royal Challengers Bangalore At Ranchi, May 22, 2015

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL-8 : चेन्नई सुपरकिंग्ज फायनलमध्ये, बंगळुरूवर 3 गड्यांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली दाेन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने शुक्रवारी आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या कर्णधार धाेनीच्या घरच्या मैदानावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 3 गड्यांनी मात केली.

प्रथम फलंदाजी करताना विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने बाद १३९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने १९.५ षटकांमध्ये गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला सलामीवीर स्मिथ आणि हसीने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी संघाला २१ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, अरविंदने स्मिथला (१७) बाद केले. त्यानंतर हसीने फाफ डुप्लेसिससाेबत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यासह या दाेघांनी संघाच्या धावसंख्येला गती दिली. डुप्लेसिसने २१ धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धाेनीने आपल्या घरच्या मैदानावर प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. या वेळी विराटच्या नेतृत्वात राॅयल चलेंजर्स बंगळुरू टीम फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. या वेळी सलामीवीर आणि कर्णधार विराट काेहलीने स्फाेटक फलंदाज क्रिस गेलसाेबत दमदार सुरुवात केली. या वेळी या दाेघांनी २३ धावांची भागीदारी केली. दरम्यान, ४.१ षटकांमध्ये आशिष नेहराने संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्याने विराट काेहलीला माेहित शर्माकरवी झेलबाद केले. बंगळुरूचा काेहली अवघ्या १२ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यापाठाेपाठ जगातील नंबर वन फलंदाज एबी डिव्हिलर्सदेखील फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवू शकला नाही. त्याला आशिष नेहराने आल्यापावली तंबूत पाठवले. डिव्हिलर्स (१) स्वस्तात बाद झाला. तसेच गत सामन्यातील सामनावीर मनदीप सिंगनेदेखील निराशा केली.

चेन्नई सहाव्यांदा अंतिम फेरीत
चेन्नईने विक्रमी सहाव्यांदा फायनल गाठली. यापूर्वी चेन्नईने २००८, २०१०, २०११, २०१२, आणि २०१३ च्या अंतिम फेरीत धडक मारली हाेती. दाेन फायनलमध्ये (२०१०, २०११) चेन्नईने किताब पटकावला हाेता. तसेच तीन वेळा चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले हाेते. मात्र, आता तिसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव काेरण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.

नेहराचे तीन बळी
चेन्नईकडून सामनावीर आशिष नेहराने धारदार गाेलंदाजी केली. त्याने चार षटकांमध्ये २८ धावा देत तीन बळी घेतले. त्याने विराट काेहलीसह डिव्हिलर्स आणि दिनेश कार्तिक या तिघांना बाद केले. तसेच आर. अश्विन, माेहित शर्मा, सुरेश रैना आणि ब्राव्हाेने प्रत्येकी एक गडी बाद केला.
हसीन अर्धशतक
चेन्नईसाठी माइक हसीने अर्धशतकी खेळी करून विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने ४६ चेंडंूत तीन चाैकार दाेन षटकारांच्या आधारे ५६ धावा काढल्या. या वेळी धाेनीने २६ धावांचे याेगदान दिले. त्याने २९ चेंडूंमध्ये एका चाैकाराच्या अधारे २६ धावा काढल्या.

रविवारी मुंबईशी हाेणार फायनल
रविवारी आयपीएलची फायनल हाेणार आहे. यात धाेनीच्या टीमला मुंबई इंडियन्सच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या सामन्यातील विजेता आठव्या सत्राच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला.


पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, सामन्यातील रोमांच...