आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Indians Beat Chennai Super Kings To Lift Second IPL Title

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चॅम्पियन\' मुंबई इंडियन्स\'वर पडला पैशाचा पाऊस, वाचा- कोणला मिळाला कोणता अवॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल-8) टी-20 क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबई इंडियन्स टीम चॅम्पियन ठरली. किताब विजेत्या मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबईने 41 धावांनी चेन्नईवर अंतिम सामन्यात मात केली. यासह मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. दुसरीकडे पराभवासह चेन्नई टीमचे तिसऱ्यांदा चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेता, उपविजेता आणि अवॉर्ड विनर्सवर पडला पैशाचा पाऊस...
विजेत्या मुंबई इंडियन्सला 15 कोटी, उपविजेता चेन्नईला 10 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. या सत्रात सर्वाधिक 562 धावा करणारा सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 'ऑरेंज कॅप' पटकावली. वॉर्नरने या सत्रात एकूण 14 सामन्यात 562 धावा ठोकल्या. त्यात 65 चौकार आणि 21 षटकारांचा समावेश आहे.

वॉर्नरने मुंबईचा फलंदाज लेंडल सिमंस आणि राजस्थानचा अजिंक्य रहाणेला मागे टाकले. रहाणे आणि सिमंसने प्रत्येक 540 धावा केल्या. चेन्नईचा ड्वेन ब्रावोने या स्पर्धेत सर्वाधिक 26 विकेट घेतले. त्याला 'पर्पल कॅप'ने सन्मानित करण्‍यात आले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, IPL-8 मध्ये कोणाला मिळाला कोणता अवॉर्ड...