आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किंग्जला नमवून मुंबई महायोद्धा, चेन्नई सुपरकिंग्जचा ४१ धावांनी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबई इंडियन्स टीम आठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन ठरली. किताब विजेत्या मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबईने ४१ धावांनी अंतिम सामना जिंकला. यासह मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. दुसरीकडे पराभवासह चेन्नई टीमचे तिसऱ्यांदा चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सिमन्स (६८) व रोहित शर्मा (५०) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०२ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईला ८ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावांपर्यत मजल मारता आली. चेन्नईसाठी स्मिथने केलेली ५७ धावांची खेळी व्यर्थ ठरली.

खडतर आव्हानाच्या प्रत्युत्तरामध्ये धोनीच्या चेन्नई टीमचे सुपरकिंग्ज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर स्मिथ आणि हसीने २२ धावांची भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. रैनाने १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह २८ धावा काढल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर सिमन्स आणि रोहित शर्माने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी केली. यात रोहित शर्माने ५० धावांचे योगदान दिले. यासह रोहित शर्मा सामनावीराचा मानकरी ठरला.

मुंबई इंडियन्सला दुस-यांदा किताब
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने दुस-यांदा आयपीएलचा किताब पटकावला. यापूर्वी मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये आयपीएलची फायनल जिंकली होती. आता मुंबईने आठव्या सत्राची फायनल जिंकली आहे.

चेन्नई चौथ्यांदा उपविजेता
चेन्नईच्या संघाने सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला पराभवामुळे उपविजेदेपदावर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे चेन्नईची टीम चौथ्यांदा उपविजेतेपदाची मानकरी ठरली. यापूर्वी, चेन्नईने २००८, २०१२, २०१३ मध्येही उपविजेतेपद पटकावले होते.

मॅक्लिनघनची धारदार गोलंदाजी
मुंबईकडून मिशेल मॅक्लिनघन, मलिंगा व हरभजनने धारदार गाेलंदाजी केली. मॅक्लिनघनने तीन गडी बाद केले. तसेच मलिंगाने २५ धावा देऊन दोन गडी बाद केले. हरभजनने २ विकेट घेऊन विजयामध्ये योगदान दिले.

मुंबईवर १५ कोटींच्या बक्षिसाचा वर्षाव
आठव्या सत्राच्या आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमवर १५ कोटींच्या बक्षिसाचा वर्षावर करण्यात आला. तसेच उपविजेती चेन्नई टीम १० कोटींच्या बक्षिसाची मानकरी ठरली. तर ऑरेंज कॅप विजेत्या डेव्हिड वाॅर्नर व पर्पल कॅप विजेत्या डॅवेन ब्राव्होला प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस मिळाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अखेरच्या सामन्याचे काही निवडक क्षण...