आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेलची \'बॉडी मसाज\': तरुणी म्हणाल्या- \'यापूर्वी कधी पाहिल्या नाहीत अशा मसल्स\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पाचा आनंद घेताना क्रिकेटर ख्रिस गेल)

मैदानावर एरव्ही फटकेबाजी करणारा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल मैदानाबाहेर नेहमी ग्रॅंड मस्ती करताना दिसतो. गेलचा हटके अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. रांचीत 22 मे रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी गेल 'रिलेक्स' झाला होता. गेलने एका सलूनमध्ये जाऊन तरुणींकडून बॉडी मसाज करून घेतली होती. एवढेच नव्हे तर गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बॉडी मसाजचे फोटोही शेअर केले आहेत.
'लव द लाइफ यू लिव्ह' असे फोटोंना शीर्षकही दिले आहे. अशा मसल्य यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या, असे मसाज करणार्‍या तरुणींनी प्रतिक्रिया दिल्याचे गेलने म्हटले आहे. गेलच्या फोटोंना जबरदस्त लाइक्स मिळत आहेत.

फनी फोटोंनी ओतप्रोत भरले आहे 'इंस्टाग्राम'
ख्रिस गेल फन लव्हिग असून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट फनी फोटोंनी ओतप्रोत भरले आहे. आयपीएल-8 मधील अनेक फोटो गेलने आपल्या अकाउंटवर शेअर केले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ख्रिस गेलने 'इंस्टाग्राम'वर शेअर केलेले फोटो...