आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli's 44 Off 19 Helped Bangalore Beat Hyderabad In A Rain Affected Match

बंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादवर 'राॅयल' विजय, विराट काेहली सामनावीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- विराट काेहलीच्या (नाबाद ४४ ) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शुक्रवारी अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत राॅयल विजयाची नाेंद केली. बंगळुरू संघाने सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार सनरायझर्स हैदराबादवर गड्यांनी मात केली. यासह बंगळुरू संघाने यंदाच्या सत्रामध्ये सातव्या विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर बंगळुरूने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा हा सहावा पराभव ठरला. यासह हैदराबादची चाैथ्या स्थानावर घसरण झाली.

प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वाॅर्नरच्या निर्धारित ११ षटकांमध्ये बाद १३५ धावा काढल्या हाेत्या. दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला षटकांमध्ये ८१ धावांचे लक्ष्य देण्यात अाले. प्रत्युत्तरात क्रिस गेल (३५) अाणि विराट काेहलीच्या नाबाद ४४ धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर बंगळुरू संघाने ५.५ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. यासह बंगळुरूने विराट विजय संपादन केला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून स्फाेटक फलंदाज क्रिस गेल अाणि विराट काेहलीने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी संघाला ४३ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यात गेलने एकट्याने १० चेंडूंत ३५ धावा काढल्या. यात चार चाैकार अाणि तीन षटकारांचा समाेवश अाहे. विराट काेेहलीने नाबाद खेळी करून संघाचा विजय निश्चित केला. मात्र, या वेळी त्याला साथ देणारा डिव्हिलर्स भाेपळा फाेडताच तंबूत परतला. त्यानंतर मनदीप सिंगने १, कार्तिकने धावा काढून तंबू गाठला.

नाणेफेक जिंकून यजमान सनरायझर्स संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वाॅर्नर अाणि शिखर धवनने संघाला दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेव्हिड वीसने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूला २.२ षटकांत महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्याने धवनला (८) बाद केले. त्यानंतर अालेल्या हेनरिक्सने डेव्हिड वाॅर्नरसाेबत शतकी भागीदारी करून डाव सावरला हाेता.
पावसाचा व्यत्यय
सनरायझर्सहैदराबाद अाणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामनादरम्यान पावसाचा व्यत्यय अाला. त्यामुळे सामना निर्धारित वेळेत रात्री वाजता सुरू हाेऊ शकला नाही. रात्री उशिरा पाऊस थांबल्याने सामन्याला १०. ३० वाजता सुरुवात झाली. त्यामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा खेळवण्यात अाला.
४४ धावांची विराटची नाबाद खेळी
३५ धावा गेलने दहा चेंडूंत काढल्या
४३ धावांची गेल-विराटची भागीदारी
०४ गड्यांनी जिंकला बंगळुरूने सामना
चौकार खेचताना सामनावीर विराट कोहली.

काेहलीचा ‘विराट’ दणका
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार काेहलीने शुक्रवारी विराट खेळी केली. त्याने हैदराबादविरुद्ध १९ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४३ धावा काढल्या. यात तीन चाैकार अाणि तीन षटकारांचा समावेश अाहे. यासह ताे सामनावीरचा मानकरी ठरला.

आयपीएल डायरी
संघ मॅच वि. परा. अनि. गुण रनरेट

चेन्नई१३ १६ + ०.६४६
बंगळुरू १३ १५ + १.०३७
कोलकाता १३ १५ + ०.३१५
हैदराबाद १३ १४ - ०.०३३
मुंबई १३ १४ - ०.३५९
राजस्थान १३ १४ + ०.०२७
दिल्ली १३ १० - ०.०४९
पंजाब १३ १० ०६ - १.४२५
बातम्या आणखी आहेत...