आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket Fans Trolls Cheteshwar Pujara On A Risky Run Out On Direct Throw Of Lungi Ngidi

पहिल्याच चेंडूवर बाद झाला चेतेश्वर पुजारा, फॅन म्हणाले- 'शायद गेहूं पिसाने जाना था'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेविरोधात सेंचुरियनमध्ये सुरू असलेल्या दुस-या कसोटीत रविवारी दुस-या दिवसाचा खेळ झाला. या मॅचमध्ये यजमान आफ्रिकेला भारताने 335 धावांत बाद केले. यानंतर टीम इंडियाच्या विकेट फटाफट पडत गेल्या. सलामीवीर लोकेश राहुल 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावरच पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. पुजारा करियरमध्ये पहिल्यांदाच गोल्डन डक आउट झाला. 9.4 षटकादरम्यान त्याने एक रिस्की धाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फील्डर लुंगी एन्गिदीच्या डायरेक्ट थ्रो वर धावबाद झाला. यानंतर सोशल मीडियात फॅन्सने पुजाराची जोरदार धुलाई केली. फॅन्सने वेगवेगळी फनी कमेंट्स करत पुजाराची खिल्ली उडविली, तसेच अशी घाई करण्याचे कारण विचारले. भारत अडचणीत पण विराटची एकाकी झुंज.... 

 

- भारताला पहिल्या डावात दिवसअखेर ५ बाद १८३ धावा काढता अाल्या. अाता १५२ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे अद्याप ५ विकेट शिल्लक अाहेत. 
- भारताचा विराट काेहली (८५) अाणि युवा अाॅलराउंडर हार्दिक पांड्या (११) मैदानावर खेळत अाहे.
- अाफ्रिकेकडून गाेलंदाजीमध्ये केशव महाराज, माेर्कल, कागिसाे रबाडा चमकले. अाफ्रिका संघाने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३३५ धावा काढल्या. अश्विनने ४ गडी बाद केले.
- प्रत्युत्तरात भारताची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर लाेकेश राहुल (१०) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकला नाही. 
- सलामीला अपयशी ठरल्यानंतर अाता विराट काेहलीने दुसऱ्या कसाेटीत अापल्या फलंदाजीचा दर्जा उंचावला. त्याने एकाकी झंुज देताना अाफ्रिकेच्या गाेलंदाजांचा समाचार घेतला. 
- त्यामुळे त्याला वैयक्तिक १५ वे अर्धशतकही अापल्या नावे करता अाले. त्याने १३० चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांसह ८५ धावांची खेळी केली. त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, काय काय आले सोशल मिडियात कमेंट...

बातम्या आणखी आहेत...