आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricket Fans Trolls Team India After Defeat In 2nd Test Match At Centurion By 135 Runs

दुस-या कसोटीत टीम इंडियाचा पराभव, मॅचनंतर खेळाडूंची अशी उडतेय खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अाफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी १३५ धावांनी विजय मिळवत भारताचे २५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या लुंगी एनगिडीने (३९ धावांत ६ बळी) भेदक मारा करत २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १५१ धावांवर रोखले. भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत केपटाऊन कसोटी गमावल्यानंतर २-० ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण अाफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. कसोटीत पराभव होताच निराश क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियात जोरदार राग काढला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत टीम इंडियाला निशाण्यावर घेतले सोबत हर एक खेळाडूंची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. लुंगी एनगिडी ठरला सामनावीर.....

 

- दक्षिण अाफ्रिकेकडून कसोटीत पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. 
- त्याने अर्धा डझन फलंदाज बाद केले. सामनावीर ठरलेल्या एनगिडीने लाेकेश राहुल, कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्याला टिपले. 
- त्याने १२.२ षटकांत ३९ धावा दिल्या. त्याचप्रमाणे कागिसो रबाडाने १४ षटकांत ४७ धावांत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले.
- आता शेवटची कसोटी २४ जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये सुरू होत आहे.

 

मॅच समरीः

 

दक्षिण अफ्रिकाः 335 आणि 258
भारत: 307 आणि 151

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियात आलेल्या फनी कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...