आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षानंतर टीम इंडियात एंट्री, आता अफ्रिकेत होईल Ex-Wife व चीटर मित्राशी सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला पती दिनेश कार्तिकसोबत निकिता. इन्सेटमध्ये मुरली विजयसमवेत निकिता.... - Divya Marathi
पहिला पती दिनेश कार्तिकसोबत निकिता. इन्सेटमध्ये मुरली विजयसमवेत निकिता....

स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात 24 जानेवारीपासून सुरू होणा-या तिस-या आणि शेवटच्या कसोटीसाठी यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या जागेवर दिनेश कार्तिक खेळणार आहे. कार्तिक 7 वर्षानंतर कसोटी संघात परतला आहे. साहाला दुखापत झाल्याने तिस-या कसोटीसाठी तो संघात आला आहे. दुस-या कसोटीत साहाच्या जागेवर पार्थिव पटेलला प्लेईंग इलेवनमध्ये स्थान मिळाले होते. दक्षिण अफ्रिकेत होईल चीटर मित्र आणि Ex- Wife शी सामना....

 
- दिनेश कार्तिक वनडे टीमचा सदस्य राहिला आहे. मात्र, आता कसोटी संघात स्थान मिळाल्याने त्याला लागलीच दक्षिण आफ्रिकेत पोहचावे लागेल.
- तेथे पोहचताच त्याचा सामना त्याची एक्स वाईफ आणि चीटर दोस्त मुरली विजयसोबत सामना होईल.
- टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजय आणि कार्तिक कधी काळी जिगरी दोस्त होते. मात्र, मुरली विजयने कार्तिकची पत्नी राहिलेल्या निकितासोबत लग्न केले आहे.

- सध्या निकिता आपला पती मुरली विजयसोबत दक्षिण अफ्रिकेत आहे.

 

मुरली विजयची मित्रासोबत चीटिंग-

 

- वर्ष 2012 पर्यंत निकिता दिनेश कार्तिकची पत्नी होती. दोघे आयपीएल-5 पर्यंत एकत्र होते. याच दरम्यान मुरली विजयची ओळख दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबत झाली.

- यानंतर निकिताचे अफेयर गुपचुप पद्धतीने मुरली विजयसोबत सुरू झाले. नंतर दोघे एकमेंकाना भेटू लागले.

- दिनेशला जसेही आपली पत्नी निकिता आणि मुरली विजयच्या अफेयरची माहिती मिळाली त्याने तिला झटक्यात घटस्फोट देऊन टाकला.

- रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटादरम्यान निकिता प्रेग्नेंट होती. घटस्फोट होताच निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले.

- आता मुरली विजय आणि निकिताला तीन मुले आहेत. दोन मुले आणि एक मुलगी. त्याच्या तिस-या मुलाचा जन्म नुकताच 2 ऑक्टोबर, 2017 रोजी झाला आहे.

- तर, दिनेश कार्तिकने इंडियन स्क्वेश प्लेयर दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले आहे. हे लग्न ऑगस्ट, 2015 मध्ये झाले होते. निकिता आणि दिनेशचे लग्न 5 वर्षे (2007-12) टिकले.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, निकिताचे पहिला पती आणि दुसरा पती मुरली विजयसोबतचे फोटोज....