आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केपटाऊन कसोटीत चमकला जसप्रीत बुमराह, असे आहे त्याचे पर्सनल लाईफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणीसमवेत बुमराह... - Divya Marathi
बहिणीसमवेत बुमराह...

स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊनमधील पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. आज चौथ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव भारताने केवळ 130 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियासमोर 208 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र, आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. 2 बाद 65 वरून खेळणारी आफ्रिका घरच्या मैदानावर अवघ्या 130 धावांत गारद झाली. 

 

यात जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 11 षटकात केवळ 39 धावा देत तीन गडी टिपले. हा गुणी गोलंदाज सुरूवातीला आयपीएलमध्ये चमकला. त्यानंतर तो टी-20 च्या भारतीय संघात आला. पुढे वन डे भारताचा हुकमी एक्का साबीत ठरू लागला. आता तर तो कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या गुणवत्तेचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता तो म्हणजे अनुभवी व यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा केलेल्या इशांत शर्माला संघाबाहेर ठेऊन बुमराहला संधी दिली गेली. अखेर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले.


बुमराहची पर्सनल लाईफचा विचार करायचा झाला तो तर गुजरातमध्ये राहणारा एका पंजाबी शीख फॅमिलीतला आहे. लहान वयातच गमावले होते वडिलांना...

 

- जसप्रीत जेव्हा 7 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने त्याची जबाबदारी सांभाळली.
- त्याच्या वडिलांचे नाव जसबीर सिंग होते जो रासायनिक पदार्थांचे व्यावसायिक होते. त्याच्या आईचे नाव दलजीत कौर आहे, जी स्कूल प्रिंसिपल आहे. 
- बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये एका पंजाबी फॅमिलीत झाला. 
- जसप्रीतला एक मोठी बहिण आहे. हे दोघेही आई दलजीत कौर यांच्या खूपच जवळ आहेत.
- बुमराहचे फेवरेट फूड गुजराती डिश ढोकळा आहे. जसप्रीतला त्याचे सहकारी क्रिकेटर्स JB नावाने बोलवतात.
- फॅमिली मेंबर्स आणि मित्रांचे म्हणणे आहे की, बुमराहचा शांत स्वभाव हीच त्याची खरी ताकद आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बुमराहचे पर्सनल लाईफचे फोटोज आणि त्याच्याशी संबंधित फॅक्ट्स... 

बातम्या आणखी आहेत...