आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Indian Cricket Captain Kapil Dev Remembers Old Days In Chandigarh Waited To See His Picture On Newspaper

विराट- अनुष्कासारखीच होती कपिल देवची 'Love Story', या अॅक्ट्रेससोबत होते सूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सारिका (डावीकडे) जिच्यामुळे कपिल देव ८० च्या दशकात चर्चेत राहायचा. - Divya Marathi
अभिनेत्री सारिका (डावीकडे) जिच्यामुळे कपिल देव ८० च्या दशकात चर्चेत राहायचा.

स्पोर्ट्स डेस्क- भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी मागील आठवड्यात (6 जानेवारी) आपला 59 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त चंदीगडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कपिल देव यांनी आपल्या काळातील आठवणींना उजाळा दिला. 

 

कपिल देव यांनी सांगितले की, त्या काळी वर्तमानपत्रात माझी बातमी आणि फोटो येण्याची मी खूप वाट पाहायचो. त्यावेळी माझे कोच देशप्रेम आझाद आणि तेव्हाचे 'द ट्रिब्यून' चे स्पोर्ट्स एडिटर सॅम्युअल बनर्जी हे खूपच चांगले मित्र होते. माझे त्यांच्यासोबत चांगले टुनिंग होते पण कोचमुळे ते माझ्या खेळातील त्रुटी शोधायचे. अर्थातच ते माझे हितचिंतक होते पण खेळ सुधारावा म्हणून टीका करायचे. त्यामुळे माझ्याबाबतीत काही छापून आले की मला बरे वाटायचे आणि मी खेळात प्रगती करतोय असे वाटायचे.

 

वयाच्या साठीमध्ये पोहचलेल्या कपिल देवने आपल्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 1983 मध्ये वर्ल्डकप दिला होता. या स्टार क्रिकेटरची लवस्टोरी सध्याचा कर्णधार विराट कोहलीसारखीच राहिली जेव्हा त्याचे नाव एका बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत जोडले गेले होते. आपल्या काळात टीमला वेगळव्या उंचीवर नेणा-या या स्टार क्रिकेटरची नजर तेव्हा सुंदर अभिनेत्री सारिका हिच्यावर पडली होती. लग्नाच्या आधी होते अफेयर...

 

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याकाळी सर्वात यशस्वी क्रिकेटर कपिलने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात अॅक्ट्रेस सारिकाच्या जवळ आले होते.
- बॉलिवूडची सुंदर अभिनेत्रीसमवेत कपिल अनेकदा पाहायला मिळाला होता. तसेच सारिका कपिल देवला भेटण्यासाठी चंदीगडलाही जायची.
- असे सांगितले जाते की, त्याा काळात कपिल अनेक बॉलिवूड पार्टीजमध्ये सारिकासमवेत असायचा.
- दोघांच्या ब्रेकअपनंतर रोमी भाटिया कपिलच्या जवळ आली आणि कपिलने रोमीसोबत लग्न केले.
- रोमीसोबतच्या अफेयर दरम्यान सारिका पुन्हा कपिलच्या जीवनात आली होती. 
- मात्र, याबाबत ना कपिलने काही बोलले ना सारिकाने. दोघांनाही आपल्या अफेयरचा कधीच उल्लेख केला नाही.

 

पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, एक वर्षापर्यंत घाबरत होते कपिल देव प्रपोज करायला...

बातम्या आणखी आहेत...