आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- जगभरात प्रसिद्ध असलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत यंदा आफ्रिकन व खासकरून इथियोपिन खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पुरूष गटात इथियोपियाच्या सॉलोमन डेक्सिसाने पहिला क्रमांक पटकावला तर त्याच्याच देशाच्या शुमेट अकालन्यू याने दुसरा क्रमांक पटकावला. तिस-या स्थानावर केनियाचा जोशुका किपकोरि राहिला. डेक्सिसीने पहिला क्रमांक पटकवताना केवळ 2 तास 9 मिनिट आणि 33 सेकंदात हे अंतर पार करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
महिला गटात इथियोपियाच्याच अमानी गोबेना हिने विजेतेपद पटकावले तर केनियाची बोर्नेस किट्टूर हिला उपविजेतेपद मिळाले.
भारतीय पुरूष गटात गोपी थोनाकल याने पहिला तर नितेंद्रसिंह रावत याने दुसरा क्रमांक पटकावला.
अर्धमॅरेथॉन शर्यतीत प्रदीपकुमारसिंग चौधरीने बाजी मारली. तर दुस-या स्थानावर शंकरपाल थापा तर, मराठमोळा व कोल्हापूरचा धावपटू दीपक कुंभार याने तिसरा क्रमांक पटकावला.
महिला अर्धमॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मराठमोळ्या संजीवनी जाधवने पहिला, तर मोनिका आथरेने दुसरा क्रमांक पटकावला.
मुंबई मॅरेथॉन विजेत्यांची यादी
फुल मॅरेथॉन (पुरुष)
प्रथम : सॉलोमन डेक्सिसा (इथियोपिया)
द्वितीय : शुमेट अकालन्यू (इथियोपिया)
तृतीय : जोशुका किपकोरि (केनिया)
फुल मॅरेथॉन (महिला)
प्रथम : अमानी गोबेना (इथियोपिया)
द्वितीय : बोर्नेस किटूर (केनिया)
हाफ मॅरेथॉन (पुरुष)
प्रथम : प्रदीपकुमारसिंग चौधरी
द्वितीय : शंकरपाल थापा
तृतीय : दीपक कुंभार
हाफ मॅरेथॉन (महिला)
प्रथम : संजीवनी जाधव
द्वितीय : मोनिका आथरे
फुल मॅरेथॉन (भारतीय पुरुष)
प्रथम : गोपी थोनाकल
द्वितीय : नितेंद्रसिंह रावत
फुल मॅरेथॉन (भारतीय महिला)
प्रथम : सुधा सिंग.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई मॅरेथॉनचे फोटोज.....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.