आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफ्रिदीने असे काय केले की तो म्हणाला, अभी तो मैं जवान हूं; पाहा Unseen फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद आफ्रिदीने केलेले हे टि्वट.... - Divya Marathi
शाहिद आफ्रिदीने केलेले हे टि्वट....

स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी स्फोटक क्रिकेटर शाहिद अफ्रिदी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रोजी झालेल्या एका मॅचमध्ये त्याने असा काही कॅच घेतला  सर्व जण आश्चर्यचकित झाले. कराची किंग्सकडून खेळताना अफ्रिदीने मॅचमध्ये फक्त 4 धावाच केल्या. मात्र, त्याने फिल्डिंगदरम्यान ही कसर भरून काढली. क्वेटा ग्लेडिएटर्सच्या बॅटिंगच्या दरम्यान 38 वर्षाच्या शाहिदने असा काही कॅच घेतला पाहणारे पाहतच राहिले. या कॅचबाबत जेव्हा त्याचाच सहकारी राहिलेल्या क्रिकेटर मोहम्मद हफीजने कौतूक केले तेव्हा आफ्रिदीने त्याला उत्तर दिले की, अभी तो मैं जवान हूं.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गेल्या वर्षी रामराम ठोकला तरी चाहत्यांच्या प्रेमाखातर पुढील दोन वर्षे पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळेन, असे आफ्रिदीने म्हटले होते. तो 2020 पर्यंत या लीगमध्ये खेळणार आहे.

 

वन डे, कसोटीतून यापूर्वीच निवृत्त-

 

- गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा करताना शाहिद म्हणाला होता, पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना मी सांघिक कामगिरी उंचावण्याला प्राधान्य दिले. 
- क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मी फाऊंडेशनच्या कामामध्ये लक्ष घालणार आहे. हे फाऊंडेशन मला अधिक महत्त्वाचे आहे.  स्वत:च्या फाऊंडेशनकडे अधिक लक्ष देणार आहे.
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मी संघातर्फे आफ्रिदी खेळतोय. 
- 2010 मध्ये कसोटी आणि 2015 वर्ल्डकपनंतर वनडेतून पायउतार होणा-या आफ्रिदीने 2015 मध्ये भारतात झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवले होते.

 

शाहिदच्या नावावर 18 वर्षे होता जागतिक विक्रम-

 

- ‘बूम बूम’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत 37 धावांत शतकी खेळी करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. 
- त्याचा जागतिक विक्रम तब्बल 18 वर्षे कायम होता. 
- 2014 मध्ये न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध 36 चेंडूंमध्ये शतक ठोकत आफ्रिदीच्या रेकॉर्डवर मात केली. 
- अर्थात हा विक्रम आता अँडरसनच्या नावावरही नाही. 
- 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्ग वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सला शतकासाठी केवळ 31 चेंडू पुरेसे ठरले.

 

आफ्रिदीची 21 वर्षाची कारकिर्द-

 

- अष्टपैलू आफ्रिदीने 21 वर्षाच्या कारकीर्दीत 398 वनडे सामन्यांत 8064 धावा केल्या. तसेच प्रभावी लेगस्पिनने तब्बल 395 विकेट घेतल्यात. 
- मात्र त्याच्या वाट्याला केवळ 27 कसोटी सामने आले. त्यात 1176 धावा केल्यात. तसेच 48 विकेट घेतल्यात. 
- 98 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 1405 धावा आणि 97 विकेट आफ्रिदीच्या नावावर आहेत. 
- मैदानावर आक्रमक पवित्रा घेणा-या आफ्रिदीकडून एक घोडचूकही झाली. 
- 2010 मधील ऑस्ट्रेलिया दौ-यात पर्थ वनडेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्याच्यावर दोन टी-20 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

 

पुढे स्लाईडद्नारे पाहा, शाहिद आफ्रिदीचे UNSEEN PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...