आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Tennis Association Weigh Down In Front Of Bhupati 's Presstence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC: भूपथीची जिद्द भारताला पडली भारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिसपटू महेश भूपतीची आपल्‍या पसंतीची जोडी जमवण्‍याची जिद्द भारताच्‍या पदक मिळवण्‍याच्‍या वाटचालीत अडचणीची ठरली. लंडन ऑलिम्पिकमध्‍ये लियांडर पेस आणि सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीतील क्‍वार्टर फायनलमधील पराभवानंतर भारताचे टेनिसमधील उर्वरित आव्‍हानही संपुष्‍टात आले. टेनिसमध्‍ये भारताला कमीत कमी एक पदक मिळण्‍याची अपेक्षा होती. मात्र भारताचे दिग्‍गज खेळाडू रिकाम्‍या हाताने भारतात परतणार आहेत.
क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिकच्‍या तयारीसाठी टेनिस खेळाडूंवर तीन कोटी 49 लाख रूपये खर्च केले होते. त्‍याशिवाय विक्रमी सात सदस्‍यांचा संघ ऑलिम्पिकसाठी लंडनला पाठवला होता. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. भारताच्‍या पदकाच्‍या अपेक्षांना धक्‍का तेव्‍हाच बसला होता. जेव्‍हा भूपतीने दुहेरीत पेस बरोबर खेळण्‍यास नकार दिला होता. अखिल भारतीय टेनिस महासंघाने (एआयटीए) जेव्‍हा दुहेरीत पेस आणि भूपती एकत्र खेळणार असल्‍याचे घोषित केले तेव्‍हाच भूपतीने बंडखोरी केली. आणि पेसबरोबर खेळणार नसल्‍याचे सांगितले. आपण पेसबरोबर न खेळता रोहन बोपन्‍नाबरोबर खेळणार असल्‍याचे सांगितले होते.
एआयटीएने पेसची बोपन्‍नाबरोबर जोडी बनवण्‍याचा प्रयत्‍न केला असता, बोपण्‍णानेही भूपतीच्‍या पावलावर पाऊल ठेवल. आणि पेसबरोबर खेळण्‍यास नकार दिला. एआयटीएला शेवटी भूपतीच्‍या जिद्दीपुढे झुकावे लागले. त्‍यांनी पेसची जोडी अनुभवहीन विष्‍णुवर्धनशी तर भूपतीची जोडी बोपण्‍णाशी बनवली.
एआयटीएने पुरूषांच्‍या दुहेरीत भूपतीच्‍या मनपसंतीचा जोडीदार तर दिला. मात्र मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाला पेसबरोबर खेळण्‍यास उतरवले. भारताला भूपती आणि सानिया मिर्झा जोडीकडून पदकाची अपेक्षा होती. कारण दोघांनी फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. आणि गेल्‍या अनेक वर्षांपासून दोघे एकत्रित खेळत आहेत.
भूपती-बोपण्‍णा आणि पेस-वर्धन दुस-या फेरीपर्यंत तर पेस-सानिया क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत झाले. एकेरीत सोमदेव देववर्मन आणि विष्‍णुवर्धन पहिल्‍या फेरीच्‍या पुढे जाऊ शकल्‍या नाहीत. महिला दुहेरीतही सानिया मिर्झा आणि रश्‍मी चक्रवर्ती पहिल्‍या फेरीतच बाहेर पडल्‍या. भारताला पदक मिळवण्‍यासाठी पेस-भूपती आणि भूपती-सानिया जोडी उतरवायला हवी होती.
क्रीडा मंत्रालयाने या सर्व खेळाडूंच्‍या तयारीवर भरपूर खर्च केला होता. सोमदेवसाठी एप्रिल 2011 ते जुलै 2012 पर्यंत विदेशी कोचसाठी 28.71 लाख रूपये खर्च केला होता. सानियानेही 15 जून 2011 ते 31 जुलै 2012 पर्यंत विदेशी कोच ठेवला होता आणि त्‍याच्‍यावर 40.71 लाख रूपये देण्‍यात आले होते. अशाच पद्धतीने भूपतीवर 42.66 लाख, बोपण्‍णासाठी 17.37 लाख तसेच प्रवासासाठी 8.25 लाख आणि विष्‍णुवर्धनवर 4.25 लाख रूपये खर्च करण्‍यात आले होते.
एआयटीएने भूपतीच्‍या जिद्दीपुढे झुकत संघात जो बदल केला. त्‍यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आणि पुन्‍हा एकदा भारतीय टेनिस संघाला क्षमता असतानासुद्धा रिकामी झोळी घेऊन परतावे लागले आहे.
OLYMPIC : मेरी कोमची विजयी सलामी
OLYMPIC: चिनी खेळाडूंची दहशत कमी होईल - साईना
OLYMPIC नववा दिवस: सेरेना नावाचे वादळ आणि कमनशिबी किम कॉलिन्‍स
OLYMPIC : लंडनमध्ये आणखी एका भारतीय मुष्टीयोद्धावर अन्याय ?
LONDON OLYMPIC : ‘गोल्डन’ स्लॅम; फायनलमध्ये सेरेनाने शारापोवाला हरवले